Home Breaking News शाहिन हकीम यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती

शाहिन हकीम यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती

0
28

 

भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार

अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) महिला आघाडीच्या राष्ट्रीय स्तरावर जिल्हा आणि परिसराचे नाव उंचावणारी महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. अहेरी येथील सक्रिय नेत्या शाहिन हकीम यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड करण्यात आली असून, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

या महत्त्वपूर्ण नियुक्त्तीबद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते शाहिन हकीम यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. शाहिन यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य आणि महिला सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान पाहता ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

सत्काराला उत्तर देताना शाहिन हकीम म्हणाल्या, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान आणि भाग्यश्री आत्राम यांची आभारी आहे. मिळालेल्या या राष्ट्रीय जबाबदारीचा उपयोग मी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी निष्ठेने करेन.”

या सत्कार सोहळ्याला नगरसेवक रणजीत गागापुरपुवार, नगरसेवक इम्तियाज खान, विजय रंगूवा, इस्माईल दादा भाई, रसिद्दीक अली, एम.डी. शानू, सुरेश कांबागोनी, विजय तोटा, राजेश बद्दी, मयूर पुपलवार यांच्यासह पक्षातील पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाहिन हकीम यांच्या राष्ट्रीय स्तरावरील निवडीमुळे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या निवडीमुळे महिलांच्या प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठावर अधिक ताकदीने मांडता येईल, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here