Home Breaking News दुबई आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत सुवर्णपदक विजेता म्हणून श्वेता कोवे हिचे;! वनवैभव संस्थेकडून...

दुबई आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत सुवर्णपदक विजेता म्हणून श्वेता कोवे हिचे;! वनवैभव संस्थेकडून अभिनंदन

0
41

 

श्वेता कोवे हिचे दुबई येथे सुवर्णपदक; वनवैभव संस्थेकडून अभिनंदन.

 

अहेरी: 13 डीसेंबर दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत कु. श्वेता कोवे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशामुळे महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल व तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे

श्वेता हिने आपल्या शालेय जीवनापासून कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत आर्चरी क्रीडाप्रकारात सातत्याने मेहनत व प्रगती करत हे यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल व तथा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

वनवैभव संस्थेचे सचिव अब्दुल जमीर अब्दुल हकीम व शाहिंन ताई हकीम यांनी कु. श्वेता हिचे विशेष अभिनंदन करून तिच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here