Home Breaking News *दिल्ली : लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर एक जवळ स्फोट |*

*दिल्ली : लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर एक जवळ स्फोट |*

0
38

दिल्ली :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “आज संध्याकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग चौकात एका ह्युंदाई i20 कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात काही पादचाऱ्यांना दुखापत झाली असून काही वाहनांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार, काही लोकांचा मृत्यू झाल्याची आणि 24 लोकांचं उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर केवळ १० मिनिटांत दिल्ली क्राइम ब्रांच आणि स्पेशल ब्रांचच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर NSG, NIA आणि FSLच्या टीम्सनी तपास सुरू केला आहे. सर्व जवळील CCTV कॅमेऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री यांनी दिल्लीचे पोलिस आयुक्त आणि स्पेशल ब्रांचचे अधिकारी यांच्याशी संवाद साधला आहे. ते दोघेही सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत. संभाव्य दिशांनी तपास सुरू केला आहे आणि कोणतीही शक्यता दुर्लक्षिली जाणार नाही. सखोल तपासानंतर जनतेसमोर संपूर्ण माहिती सादर केली जाईल, असे अमित शहा म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here