
गडचिरोली : जिल्ह्यातील एकमेव असलेल्या घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी शनिवारी १३ डिसेंबर रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली. अहेरी तालुक्यात दोन केंद्रावर शांततापूर्ण वातावरणात ही परीक्षा पार पडली.
अहेरी तालुक्यात भगवंतराव हायस्कुल, अहेरी आणि एकलव्य रेसिडेन्शिअल मॉडेल स्कूल अहेरी या दोन केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी भगवंतराव हायस्कूल केंद्रात २०८ विध्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी १९९ विद्यार्थ्यांनी तर एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूलच्या केंद्रावर ४०८ पैकी ३७७विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. एकंदरीत संपूर्ण अहेरी तालुक्यात या परीक्षेसाठी ६१६ विध्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी ४० विध्यार्थी गैरहजर असल्याने ५७६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. मात्र शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत शांततापूर्ण वातावरणात परीक्षा पार पडली.
अहेरी भगवंतराव हायस्कूलच्या केंद्रावर ०९ आणि एकलव्य रेसिडेन्शिअल मॉडेल स्कूलच्या केंद्रावर १७ असे एकूण २६ रूममध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली. एकूण २७पर्यवेक्षकांनी कामकाज सांभाळले तर गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार यांची करडी नजर होती. त्यासोबत परीक्षा केंद्रावर पोलिसांचा देखील बंदोबस्त होता.
भरारी पथकाची करडी नजर
अहेरी तालुक्यातील भगवंतराव हायस्कूल तसेच एकलव्य रेसिडेन्शिअल मॉडेल स्कूल या दोन्ही परीक्षा केंद्रावर कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेत स्वतः बीडीओ गणेश चव्हान यांनी भरारी पथक सोबत घेऊन दोन्ही केंद्रावर भेटी देत पाहणी केली. त्यामुळे दोन्ही परीक्षा केंद्रावर शांततापूर्ण वातावरण दिसून आले.