Home Breaking News भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये आलापल्ली आयटीआयतील ७८ प्रशिक्षणार्थीची लॉइड्स मेटल्स कंपनीत...

भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये आलापल्ली आयटीआयतील ७८ प्रशिक्षणार्थीची लॉइड्स मेटल्स कंपनीत निवड.

0
37

 

एकूण प्रशिक्षणार्थीः १०३ अंतिम निवड झालेले प्रशिक्षणार्थीः ७८

अहेरीः 12 डिसेंबर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), आलापल्ली येथे दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी नामांकित लॉयडस मेटल्स प्रा. लि. (Lloyds Metals Pvt. Ltd.) कंपनीतर्फे भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. या प्लेसमेंट ड्राईव्हला संस्थेतील विविध ट्रेडमधील प्रशिक्षणार्थीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ट्रेडनिहाय सहभाग आणि निवडः

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये फिटर, एमएमव्ही (MMV), प्लंबर, आरएसी (RAC), वेल्डर, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन यांसारख्या विविध ट्रेडमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

एकूण प्रशिक्षणार्थीः १०३

अंतिम निवड झालेले प्रशिक्षणार्थीः ७८

सखोल मुलाखत प्रक्रियेनंतर एकूण ७८ प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात आली आहे, ही संस्थेसाठी एक मोठी उपलब्धी आहे.

निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कंपनीतर्फे पुढील टप्प्यात चार महिन्यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षण कालावधीत त्यांना प्रशिक्षण भत्ता देखील देण्यात येणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर या उमेदवारांना कंपनीमध्ये ‘On Roll Employee’ म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात येणार आहे.

प्राचार्यांकडून अभिनंदनाचा वर्षावः

संस्थेच्या प्राचार्यांनी मिलिंद लोने यांनी विक्रमी प्लेसमेंटबद्दल समाधान व्यक्त केले आणि निवड झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच, भविष्यात विद्यार्थ्यांसाठी आणखी रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ट्रेनिंग, कौंसेलिंग आणि प्लेसमेंट सेल, संस्थेतील इतर सर्व कर्मचारी तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जीमलगट्टा येथील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here