Home Breaking News *महिला कर्मचाऱ्यास आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलचेरा तालुका आरोग्य अधिकारी निलंबित*

*महिला कर्मचाऱ्यास आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलचेरा तालुका आरोग्य अधिकारी निलंबित*

0
82
गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतले कठोर पाऊल; विभागीय चौकशीचे आदेश

गडचिरोली : कंत्राटी आरोग्य सेविकेस मानसिक त्रास
देऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याच्या गंभीर आरोपांनंतर, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुलचेरा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांना तातडीने निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.

डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाची सखोल विभागीय चौकशी करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदीनुसार त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांचा छळ आणि डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूच्या आरोपांवरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष ताटिकोंडावार यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक आरोग्य विभागाने ही मोठी आणि कठोर कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here