Home कोरची कोरची तालुक्यात कुमारी मातांचे प्रमाण चिंताजनक- पोलीस निरीक्षक अमोल फडतरे

कोरची तालुक्यात कुमारी मातांचे प्रमाण चिंताजनक- पोलीस निरीक्षक अमोल फडतरे

0
28

 

 

कोरची

तालुक्यात कुमारी मातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. असे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांनी येथील जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमात म्हणाले. एकदा कुमारी माता झाल्यावर त्या आरोपी मुलांना सुधारगृहात पाठवले जाते. मुली बाळंत झाल्यावर त्यांना माहेरी राहावे लागते. त्यावेळी समाज त्या मुलींकडे वेगळ्या नजरेने पाहतात. त्यामुळे त्या मुलींचे आयुष्य उध्वस्त होतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देने आवश्यक आहे. आपल्या तालुक्यात दिवसेंदिवस दारूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकुण केसेसच्या 50% केसेस दारूच्या येत आहेत. दारूमुळे समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे लोकांनी याकडे सुद्धा लक्ष द्यावे. आजच्या तारखेला प्रत्येकाकडे एन्ड्राईड मोबाईल आहे. त्या मोबाईल च्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे घडत आहेत. युवकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे जमलेल्या युवक- युवतींना संबोधित केले.

या तालुक्यात बीना परवाना अनेक कमी वयाचे युवक व लोक टू व्हीलर चालवितात. अठरा वर्षाखालील मुलं टू व्हीलर चालवताना रस्त्यावरती दिसत असतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक वाढले असून ड्रायव्हिंग लायसन नसल्यामुळे शासनाच्या योजनेचा अपघातामुळे काही मोबदला मिळत नाही .तसेच कमी वयात टू व्हीलर चालवण्यासाठी पालकांनी दिली त्यामुळे पालकावरती गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पालकांनी 18 वर्षाखालील मुलांना गाडी चालवायला देऊ नये .असे आव्हान कोरची पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांनी यावेळी केले.

पुढे बोलताना शासनाच्या सर्व योजना आहेत त्या गडचिरोली पोलीस दलाकडून पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे .त्या योजनेचा प्रत्येक समाजाच्या बांधवांनी घेण्याची आव्हान केले. तालुक्यातील युवकांमध्ये व युवती मध्ये स्मार्टफोनचे अधिक आकर्षण झाले असून यामुळे कमी वयामध्ये प्रेम संबंध जास्त प्रमाणात जुळून येत असल्याचे निदर्शनात येत असून यामुळे प्रेम संबंधामुळे कमी वयात कुमारी माता होण्याचे प्रमाण अधिक असल्याने गुन्ह्याचा प्रमाण वाढलेला आहे .यामध्ये मुलीच्या व मुलाच्या आई-वडिलांची तक्रार करण्याची मानसिकता नसताना अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी शासकीय काम करीत असताना गरोदर माताची नोंदणी करून तपासणी करण्यासाठी रुग्णालयात नेतात व तिथे आरोग्य विभागाकडून पोलीस स्टेशनला कमी वयाचे असल्याचे एम एल सी पाठवले जाते. त्यामुळे पोस्को सारखी गुन्हे दाखल होत आहेत. ही गंभीर चिंतेची बाब आहे त्यामुळे पालकांनी मुला मुलींच्या वागण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here