Home कोरची कोरची आश्रम शाळेत प्रेरणादायी मार्गदर्शन, “नियमित मनपूर्वक अभ्यास केल्यास यश” -तेजस्विनी टेभुर्णे...

कोरची आश्रम शाळेत प्रेरणादायी मार्गदर्शन, “नियमित मनपूर्वक अभ्यास केल्यास यश” -तेजस्विनी टेभुर्णे नगरसेविका

0
31

 

 

कोरची

येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची येथे दिनांक १२ऑगस्ट २३ रोज शनिवारला विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी याकरिता प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी तेजस्विनी टेभुर्णे नगरसेविका कोरची हिला मार्गदर्शन करीता प्राचारण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून यशस्वी होण्यासाठी विचारणा केली. ‘नियमित शाळा व अभ्यास केल्यास आपण चांगले उच्च दर्जाचे शिक्षण घेवू शकतो तसेच आश्रम शाळेतील शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन उच्च घेण्यासाठी मला प्रभावी ठरले” असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक होते प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी तेजस्विनी टेभुर्णे नगरसेविका कोरची उपस्थित होते. यावेळी शाळेतील प्रा.परेश मेश्राम प्रा.हरेश कामडी प्रा.रमेश रामटेके प्रा.अरुण कायंदे प्रा.मनोज गजभिये प्रा.अभिमंन्यू वाटगुरे जेष्ठ शिक्षक भैयालाल कुरसंगे, डाकराम ठाकरे, देवेंद्र मडावी, संतोष सहारे,गीता राऊत, सुषमा अंबोणे, लीना वाटगुरे, प्रशिल जांभूळकर, मनोज आचार्य, निलमचंद कापगते, अश्विनी कापगते, भारती चौधरी, दिक्षा टेभुर्णे, क्रीडाशिक्षक महेश उरकुडे, नैना येंगलवार,सुधाकर पुसाम आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुमिका मडावी हिने केले तर आभार डाकराम ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर सातपुते, मिलिंद पिलारे यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here