Home कोरची जि.प.शाळा कोरची येथे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

जि.प.शाळा कोरची येथे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

0
33

 

कोरची :: स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथे महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून कार्यक्रम घेण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा .प्रमोदिनी काटेंगे ,प्रमुख पाहुणे मा.महेश जाळे, मा. कांता साखरे यांनी भूषविले. काही विद्यार्थ्यांनी म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली. इ.2री ची निधी काटेंगे ,पेझल भैसारे. इ.5 वी च्या साक्षी मेश्राम, अर्णवी सहारे, करिश्मा धोंडणे यांनी सुंदर शब्दात म.फुले यांच्याविषयी भाषण दिले. साक्षी मेश्राम हिने इंग्लिश मध्ये म.फुले यांच्याविषयी भाषण दिले.
महेश जाळे यांनी म.फुले यांचे सामाजिक कार्य आपल्या भाषणातून मांडले. कांता साखरे यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले मौल्यवान कार्य व अस्पृश्यांसाठी केलेल्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. प्रमोदिनी काटेंगे यांनी म.फुलेचे आपल्या जिवनामध्ये अतिशय मोलाचे स्थान आहे हे आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कांता साखरे यांनी केले .आभारप्रदर्शन रौनक अंबादे या विद्यार्थ्याने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here