आरमोरी येथील माँ जिजाऊ महिला बचत गटाच्या वतीने नंदनवन कॉलनी येथे 26 नोव्हेंबर रोजी सामूहिक तुळसी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते.
मागील पाच वर्षापासून नंदनवन कॉलनी येथे मा जिजाऊ महिला बचत गटाच्या वतीने आयोजित केला जातो.
कॉलनीतील सर्व महिलांनी आपली तुळशी वृंदावने सजवून येथील उद्यानात आणली होती. तुळसी विवाह स्थळ सुंदर सुंदर रांगोळीने काढून सजवले होते , सायंकाळी कॉलनीतील सर्व नागिकांच्या उपस्थित मोठ्या थाटामाटात तुळशी विवाह सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी वेगवेळ्या फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली विवाह नंतर लगेच येथील नागरिकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. मा जिजाऊ महिला बचत गट नेहमीच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करतात . या कार्यक्रमात सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी होतात.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्का मेश्राम, निलिमा लाकडे, वनिता डोकरमारे, श्रेया कोटरंगे, प्रीती सोनकुसरे, पुष्पा बोरकर, रिना मने, वैशाली ढोरे, अश्विनी मेश्राम, सुलभा डोके,दीप्ती कोलते, उज्वला पारधी, अर्चना जाधव , सरोज म्हस्के , कुंदा जाधव तसेच येथील सर्व पुरुषांनी सहकार्य केले


