Home Breaking News पोलीस महासंचालक सदानंद दाते गडचिरोलीच्या दौऱ्यावर

पोलीस महासंचालक सदानंद दाते गडचिरोलीच्या दौऱ्यावर

0
74

 

पदभार स्वीकारून महिना उलटला नाही पोलीस महासंचालक गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागात दाखल

गडचिरोलीः महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी ३१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून अतिसंवेदनशील भागातील विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी भामरागड उपविभागांतर्गत २४ जानेवारीला नव्याने स्थापन झालेल्या पोमकें बिनागुंडा केंद्राला भेट दिली. येथे अभियान तयारीची तपासणी करून उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

या भेटीदरम्यान पोमकें बिनागुंडा हद्दीतील नागरिकांसाठी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य महाजनजागरण मेळावा आयोजित झाला. या मेळाव्यात उपस्थित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाटप केले.

या जनजागरण मेळाव्यात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आपल्या मार्गदर्शनात नवीन केंद्रातून शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल. अतिदुर्गम भागात रस्ते, आरोग्यसेवा व इतर सुविधा लवकर उपलब्ध करू. पोलीस दल नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी खंबीरपणे उभे राहील. असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी दौऱ्यात पोस्टे वांगेतुरी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन देखील केले.

विशेष म्हणजे पोलीस मुख्यालयाच्या एकलव्य सभागृहात कसनासूर-बोरीया चकमकीतील शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल ३१ शौर्यपदक प्राप्त अधिकाऱ्यांना प्रशस्तिपत्राने सन्मानित करण्यात आले. तसेच गडचिरोलीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ५ पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती देत पिपिंग समारंभ पार पडला. दाते यांनी जवानांशी संवाद साधत, “बलिदान देणाऱ्यांचे स्मरण कायम राहील. अवघड परिस्थितीत प्रामाणिकपणे मोठे उद्दिष्ट साध्य करा,” असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात अपर पोलीस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील, निसार तांबोळी, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here