Home कोरची महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात सायकल वाटप

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात सायकल वाटप

0
28

:- कोरची येथून 9 किमी अंतरावर असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा जी जे कनिष्ट महाविद्यालयात 5 किमी अंतरावरून बाहेरगावरुन येणाऱ्या 27विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार नुरुटी ,शाळेचे मुख्याध्यापक संजय वाढई तसेच मदन कोल्हे, बुद्धीसिंग नैताम ,सुरेश गावतुरे सदर मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रामलालजी नुरुटी ,जुगेल नुरुटी तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डी वी वाढई उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक माकडे ,शेंडे ,राजिम नुरुटी ,अंकालू नंदेश्वर ,हेमलता काळबांधे, ओमेश्वर दोनाडकर ,शोभा सोनुले आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here