Home कोरची रा.काँ. चे शहर अध्यक्ष अविनाश हुमणे यांच्या प्रयत्नातून वंचित असलेल्या कोरची वासियांना...

रा.काँ. चे शहर अध्यक्ष अविनाश हुमणे यांच्या प्रयत्नातून वंचित असलेल्या कोरची वासियांना मिळणार पंतप्रधान आवास योजनेचा लाभ..

0
32

 

कोरची:- कोरची शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळून आठ वर्षे उलटून गेली असले तरी इथल्या नगर वासियांना पंतप्रधान आवास योजनेचा पाहिजे तेवढा लाभ मिळाला नाही. कारण भूमी अभिलेख कार्यालयामार्फत २०१६-१७ या साली कोरची नगरपंचायतीचे भूमापन योग्य पध्दतीने केले गेले नसल्यानी इथल्या अनेक नगर वासियांना या योजनेपासून वंचित राहावे लागले. याच विषयला धरून रा.काँ. चे शहराध्यक्ष अविनाश हुमणे यांनी पाठपुरावा करुण संबंधित विभागाला नियमित पत्र व्यवहार करुण सुध्दा काही निकस न निघाल्याने मा. अवर सचिव, महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांच्या ही बाब लक्ष्यात येताच त्यांनी मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांना या बाबतीत चौकशीचे निर्देश दिले. यावर सदर विभागाने उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर व जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख गडचिरोली यांना या बाबतीत माहिती देण्याचे कळविले, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख गडचिरोली यांनी कोरची भूमी अभिलेख कार्यालयाला यावर तात्काळ कार्यवाही करुण केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल कार्यालयास सादर करावा असे निर्देश दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here