Home कोरची कोटगूल को-ऑपरेटिव्ह शाखा बँकेत मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी केला चोरीचा प्रयत्न; बँकेचा मोठा...

कोटगूल को-ऑपरेटिव्ह शाखा बँकेत मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी केला चोरीचा प्रयत्न; बँकेचा मोठा नुकसान

0
31

 

 

कोरची

कोरची तालुका मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर येत असलेल्या कोटगूल येथील एकमेव को-ऑपरेटिव बँक शाखेमध्ये अज्ञात चोरट्यानी चोरीचा प्रयत्न केला असल्याची घटना २३ नोव्हेंबर च्या सकाळी उघडकीस झाली यामध्ये पैसा चोरीला गेलेला नाही परंतु बँकेचा मोठा नुकसान झालेला आहे.

प्राथमिक माहितीनुसार कोटगुलच्या दि गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँक येथे अज्ञात चोरट्याने गुरुवारच्या मध्यरात्री चोरीच्या प्रयत्न केला आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चेक केले तेव्हा अज्ञात चोरट्यांने सुरवातीला बँकेतील इमारतीच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून शटर फोडले त्यानंतर दरवाज तोडून आत मध्ये शिरला. कॅश काऊंटरच्या केबिनकडे जाऊन तेथील काच फोडलं आणि काच फोडून कॅश काऊंटरच्या आत मध्ये शिरले कॅश काऊंटरच्या डोर मध्ये पैसे वगैरे आहेत का म्हणून बघितले परंतु त्यांना पैसा दिसला नाही परत त्या ठिकाणाहून तो परत निघून गेला. परंतु यामध्ये बँकेतील सामानांचं अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाला असल्याचे बोलले जात आहे.

सदर घटनेची माहिती उघडकीस झाल्यानंतर बँकेच्या शाखा व्यवस्थापक रमेश जांभूळकर यांनी कोटगुल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली यानंतर कोटगुल पोलीस घटनास्थळी दाखल होऊन बँकेत काय चोरीला गेले काय नाही याची संपुर्ण तपास सुरू केला आहे तसेच सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेल्या अज्ञात चोरट्याला पकडण्याच्या आव्हान कोटगुल पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here