Home कोरची कोरची तहसील कार्यालयत नव्याने रुजू झालेले तहसीलदार प्रशांत गड्डम यांचे व्हॉइस ऑफ...

कोरची तहसील कार्यालयत नव्याने रुजू झालेले तहसीलदार प्रशांत गड्डम यांचे व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्याकडून स्वागत

0
21

 

कोरची
कोरची तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार म्हणून नव्याने रुजू झालेले प्रशांत गड्डम यांचा कोरची तालुका व्हाईस ऑफ मीडिया पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले. यापूर्वीचे तहसीलदार सोमनाथ माळी यांची काही महिन्यापूर्वी बदली झाली. त्यानंतर कोरची तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार म्हणून कोणते अधिकारी येणार याची उत्सुकता व चर्चा तालुक्यातील नागरिकांमध्ये होती. काही काळ येथीलच नायब तहसीलदार म्हणून असलेले अनंत बोदेले, नायब तहसीलदार गणेश सोनवाणी यांनी कार्यभार सांभाळल होता. परंतु कोरची तहसीलदार म्हणून प्रशांत गड्डम यांची नियुक्ती झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
गड्डम यांनी तहसील कार्यालयातील कार्यभार हाती घेतल्यानंतर अनेक कामाना वेग आले आहे. शासनाकडून येत असलेल्या विविध उपक्रमे राबवित असून त्यामध्ये ०१ ते ०७ ऑगस्ट महसूल सप्ताह, महसूल दिन, युवा संवाद त्यानंतर कोतवाल भरती प्रक्रियेचा कामकाज सध्या बघत आहेत. तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असतांनाही सर्व कामांना वेळेवर करून कर्तव्य बजावत आहेत.
तहसीलदार प्रशांत गड्डम यांचे स्वागत करून शुभेच्छा देतांना कोरची तालुका वाईस ऑफ मीडिया अध्यक्ष लिकेश अंबादे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर वैरागडे, तालुका उपाध्यक्ष लालचंद जनबंधू, कार्याध्यक्ष शालिकराम कराडे, सरचिटणीस मधुकर नखाते, खजिनदार सुरज हेमके, संघटक राष्ट्रपाल नखाते, कार्यवाहक अरुण नायक, सदस्य राकेश मोहुर्ले, श्यामकुमार यादव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here