माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या गटाची बैठक आज
दिनांक 11 /8 /2023 रोज शुक्रवारला गोटुल भवन दर्रोटोली कोरची येथे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माननीय अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आले. यावेळी त्रिवेशजी चव्हाण, गणेशजी मडावी, मुर्राजी पोरेटी, धर्माजी तोफा, सुरजु हिडामी, सौरभजी मंडल, विरेंद्रजी जुडा, कोटगुल ,रुपलालजी गावडे यांचे जिल्हाअध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार व माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह गजभिये तसेच कोरची तालूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश घेण्यात आले.तसेच अतुलभाऊ गण्यारपवार यांच्याहस्ते नव्याने पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ व पक्षाचा दुपट्टा देऊन सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
शरद पवार गटाच्या तालुका अध्यक्ष पदाकरिता पदाधिकाऱ्यासोबत चर्चा केली असता प्रतापसिंह गजभिये, अविनाश हुमणे, रामनाथ कोरचा, चेतन कराडे, यांचे नाव सुचविण्यात आले. परंतु सर्वानुमते माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापसिंह गजभिये यांना सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी पसंतीचा क्रम देऊन पुढील निवड समितीकडे विचार मांडण्यात आले आहे. याबाबत पुन्हा दोन दिवसात सभा लावून तालुक्याची कार्यकारणी गठीत करण्यात येणार आहे. व येणाऱ्या दोन दिवसात तालुका अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे.
सदर सभेला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली शहर अध्यक्ष विजयभाऊ गोरडवार, नईमभाई शेख गडचिरोली, सुनीलभाऊ चिमुरकर गडचिरोली, तसेच कोरची तालुका पदाधिकारी केशवराव लेनगुरे, विजयताई बोगा, नगरपंचायत सदस्य सुनंदाताई कुमरे, रामनाथ कोरचा, अविनाश हुमणे, ,सुमनताई हलामी, नलिनीताई सिंदराम, शारदा नैताम, विनोद गुरनुले, चेतन कराडे, सुनिल सयाम सरपंच मसेली, धनराज मोहूर्ले, श्रीराम नैताम, रोशन शेंडे, चंदू वालदे, महेश लेनगुरे,अशोक गुरनुले, दिनेश दररो, उदाराम कोरचा, समसाय बोगा, दुलोरसिंग वटी, अविनाश बोगा, योगेश हारामी, दरबारी कोरचा, सलीम पठण, दयाळू कपूर, तसेच बहुसंख्येने कार्यकर्ते सभेला उपस्थित होते.


