पावसाळ्यानंतर डासांच्या प्रादुर्भाव, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज
कोरची
दरवर्षी पावसाळ्यात डासांचे प्रादुर्भाव वाढताना दिसून येतात त्याचे कारण म्हणजे परिसरामध्ये अस्वच्छता टाकाऊ टायर, डबके, साचलेला पाणी अशा ठिकाणातून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पावसाळा व पावसाळ्यानंतर सुद्धा डासांचा प्रादुर्भाव अधिक वाढताना दिसून येतो. डासांमध्ये आठ प्रकारचे प्रजाती असून त्यामधील तीन प्रकारचे प्रजाती डास आपल्याकडे आढळतात त्या तीन प्रकारच्या डासांच्या चावीमुळे मलेरिया, डेंगू-चिकनगुनिया मेंदूज्वर सारखे भयानक आजार होऊ शकतात. डासांची उत्पत्ती हे जुलै ते डिसेंबर महिन्यामध्ये अधिक प्रमाणात होते यामधील जुलै ते ऑगस्ट अशा महिन्यात हिवताप रुग्णांचे प्रमाण अधिक आढळून येते.
त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. घरामध्ये व घराच्या परिसरामध्ये टाकाऊ टायर, भांडे सारख्या कबाडी वस्तू जमा ठेवू नये रात्री झोपताना नियमित मच्छरदाणीचा वापर करावा घराच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवली तर आपण या आजारांपासून दूर राहू शकतो दरवर्षी पावसाळ्यानंतर मलेरियाचे रुग्ण तालुक्यामध्ये आढळताना दिसून येतात. यासाठी शहरात, गावात आरोग्य विभाग व ग्रामपंचायत, नगरपंचायत कडून नाल्यामध्ये दवाई फवारणी करण्याची गरज आहे.
डासांचे प्रकार
१) अँनाफेलस
२) एडिस इजिप्ती
३) क्युलेक्स
४) क्युलेसेटा
५) मानसोनिया
६) सोरोप्फोरा
७) टॉक्सोऱ्याईटस
८) व्योनिया
यापैकी वरील तीन डास आपल्याकडे आढळतात.
डासांमुळे होणारे आजार
अँनाफेलस- डास
या डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया आजार होते हे डास साधारणतः घराच्या परिसरातील डबके, टायर्स, शेन सारवण्याच्या डबक्यात, टाके इत्यादी मध्ये याची उत्पत्ती होते.
एडिस इजिप्ती- डास
या डासाची मादी चावल्यामुळे डेंगू चिकनगुनिया आजार होते. हे डास साधारणत: कुलर, खड्ड्यातील साचलेल सांडपाणी, डबके, नाल्यात, इत्यादीमध्ये उत्पत्ती होते.
क्युलेक्स- डास
या डासाची मादी चावल्यामुळे मेंदूज्वर सारखे आजार होते. हे डास साधारणतः शेतातील साचलेल्या पाण्यामध्ये याची उत्पत्ती होते.
कशी घ्याल काळजी
आठवड्यातून एक दिवस नागरिकांनी घरातील वाचणाऱ्या भांडे उलटे करून कोरडा दिवस म्हणून पाळावे. रात्र नेहमीच झोपतानी मच्छरदाणीचा वापर करावा. घराच्या परिसरातील अवतीभोवती भांड्यामध्ये पाणी साचू देऊ नये, टाकाऊ टायर्स डबके, उघड्यावर सांडपाणी साचू देऊ नये.
कोट
शासकीय नियमानुसार जिल्हास्तरावर नियोजन करून प्रत्येक गावात डास नष्ट व्हावे म्हणून लॅमडा सायराथ्रीन या कीटकनाशकाची फवारणी करून आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत गावातील डबके व उघडे भांडे, मडके यांना नष्ट करण्याचे काम करून डासाची उत्पत्ती साधने नष्ट करण्याची कामे केले आहेत.
अनिकेत भांडारकर
तालुका हिवताप पर्यवेक्षक कोरची.
तालुक्यात हिवताप कमी व्हावा याकरिता दोन वर्षा आधी प्रत्येकांच्या घरी मच्छरदाणी वाटप करण्यात आली होती तसेच प्रत्येक गावात आरोग्य विभागामार्फत फवारणी करून गावातील नागरिकांची काळजी घेतली जाते. तसेच नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घरच्या बाजूला डास उत्पत्ती होणारे डबके भांडे उलटून या दिवसात स्वतःची सुरक्षा करावी व हिवतापाला आडा घालावे.
डॉ विनोद मडावी
तालुका आरोग्य अधिकारी कोरची.
कोरची तालुका मलेरियाचे रुग्ण २०२२
जानेवारी – १८ रुग्ण
फेब्रुवारी – १० रुग्ण
मार्च – १० रुग्ण
एप्रिल – ०८ रुग्ण
मे – ०६ रुग्ण
जून – ०४ रुग्ण
जुलै – ६१ रुग्ण
ऑगस्ट – ४३ रुग्ण
सप्टेंबर – १६ रुग्ण
ऑक्टोबर – ०९ रुग्ण
नोव्हेंबर – २७ रुग्ण
डिसेंबर – २१ रुग्ण
असे एकूण २३३ रुग्ण मागील वर्षी आढळले होते.


