सौ.मनिषा नखाते यांची अध्यक्ष म्हणुन तर उपाध्यक्षपदी भुमेश्वर देशमुख यांची सर्वानुमते निवड
बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम 2009 मधील भाग -4,कलम 21(अ)
नुसार
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरची येथे दिनांक 1 ऑगस्ट 2023 ला रोज मंगळवार ला दुपारी 2.00 वाजता शाळा व्यवस्थान समिती नविन न कार्यकारीणीची निवड व गठण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.तसेच लोकमान्य गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊं साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान दुधनांग यांनी भुसवीले तर, प्रमुख अतिथी म्हणुन मुख्याध्यापक टेंभुरकर सर तसेच अंबादे सर व पालक वर्ग होते. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणुन सौ.मनिषा राष्ट्रपाल नखाते यांची निवड करण्यात आली.तर
उपाध्यक्षपदी श्री.भुमेश्वर शिवदास देशमुख यांची निवड करण्यात आली
तर सदस्य म्हणून सौ.पुनम मेघश्याम जमकातन.,तब्बेज जाडीया,सौ.सुरेखा बखर,संगीता अंबादे,मनोज सोनकुकरा,श्रीहरी मोहुलेँ ,सौ.रामती बोगा,वेणुबाई सोनार,संगीता भैसारे, दिपक ढेक,पवन राँले ,ललिका ठलाल, कु.ज्योती नैताम , (शिक्षणतज्ञ सचिव स्था.प्रा.स.),सौ.कांता प्यारेलाल साखरे, (शिक्षण सदस्य ) ,लतिका विलास ठलाल (दुर्बल घटक सदस्य ) कु. शरवरी भुमेश्वर गावतुरे (सिवकृत सदस्य,) पवन छत्रपती बांगरे (सिवकृत सदस्य, ) यांची यांची
सर्वानुमते निवड करण्यात आली.
मा. अरविंद टेंभूरकर मु.अ यांनी प्रस्तावनेतून शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करून शाळेच्या विकासाकरिता समितीने सहकार्य करावे असे स्पष्ट करण्यात आले .
कांता साखरे यांनी शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याच्या निकषांवर मार्गदर्शन केले. प्रमोदिनी काटेंगे यांनी इ.पहिली ते सातवी च्या वर्गनिहाय पालक सदस्य निवडीबद्दल मार्गदर्शन केले. मारोती अंबादे यांनी सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबद्दल प्रोत्साहन दिले .मेघा बुराडे यांनी समितीमध्ये महिलांनी पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शन केले. कोरची केंद्राचे केंद्र प्रमुख मा.हिराजी रामटेके सर यांनी नवनियुक्त अध्यक्ष सौ.मनिषा राष्ट्रपाल नखाते आणि उपाध्यक्ष श्री.मुनेश्वर शिवदास देशमुख यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती चांदेकर यांनी केले. आभारप्रदर्शन महेश जाळे यांनी केले. कार्यक्रमाकरीता आणि नविन शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्याकरीता मु.अ.अरविंद टेंभूरकर ,कांता साखरे, प्रमोदिनी काटेंगे, मारोती अंबादे, आरती चांदेकर, महेश जाळे, मेघा बुराडे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आले.


