Home कोरची समग्र शिक्षा अभियान कार्यालय,  गट साधन केंद्र कोरची येथील इमारत धोक्याची,...

समग्र शिक्षा अभियान कार्यालय,  गट साधन केंद्र कोरची येथील इमारत धोक्याची, जीवितहानी नाकारता येत नाही, ही इमारत कंत्राटी कर्मचारी च्या जीवावर उठते की काय?असा प्रश्न कर्मचारी करीत आहेत ,

0
26

कोरची

 

 

तालुका कोरची अंतर्गत अंदाजे ९५% जि. प. शाळांचीही दुरावस्था अशीच ,,,

विद्यार्थी बसणार कुठे ? मोडकळीस आलेल्या इमारतीत विद्यार्थ्यांना बसविण्यात येते.इमारत बांधकामाला फक्त १०/१५वर्षे झाली तरी वर्गखोल्या बसण्यालायक नाहीत,विद्यार्थी जिव मुठीत घेऊन शाळेत बसतात.तरीही प्रशासनाची उदासीनता चर्चेचा विषय आहे.या सर्व बाबींसाठी जबाबदार कोण?विद्यार्थ्यांच्या जिवाची पर्वा कोणाला नाही.अशा उदासीन कुंभकर्णि प्रशासनाची घोर निंदा करण्यात येत आहे.जिवीत हानी झाल्यास सदर जबाबदार अधीका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जावा असे संबंधीत ग्रामस्थांची मागणी आहे.

तालुक्यातील शाळामध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळें एकच शिक्षक ४वर्गांना सांभाळतो.त्यामुळें विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढणार.जि.प.शाळा बुडविण्याचे एकूणच कारस्थान रचले आहे.जिल्ह्यावरून दुर शेवटच्या टोकावर असल्यामुळें धोबी का कुत्ता न घर ना घाट का अशी कोरची तालुक्याची दयनीय स्थिती दिसते.स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन वर्तणुक व भोंगळ प्रशासन लोकांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले करण्याचा विचार आहे की काय ?अशी चर्चा आहे.आता लोकप्रतिनिधीं व प्रशासन काय करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

कोरची

गट साधन केंद्र,

सर्व शिक्षा अभियान कार्यालय,

तालुक्यातील शिक्षणाचं केंद्र बिंदू आहे, या कार्यालयातून विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जाते,

सर्व शिक्षा अभियानाचे मुख्य उद्देश पायाभूत सुविधा टिकविणे व वाढविणे,लिंगदरी कमी करणे,शिक्षणातील सामाजिक दरी कमी करून विद्यार्थ्यची अध्ययन समृद्धी वाढविणे,नवीन शाळा उघडणे,पर्याप्त शिक्षण सुविधा,शाळा बांधकाम,

वर्गखोल्या बांधकाम, स्वच्छता गृह बांधकाम,

पिण्याच्या पाण्याची सोय,

शिक्षण प्रशिक्षण, पाठपुस्तक पुरविणे, या इमारतीत असे नवनवीन उपक्रम राबविले जातात,परन्तु हीच इमारत जीर्णोद्धार असल्याने,ज्याचे पाय खड्यात,,तो कसा काढेल दुसर्याला खड्यातून बाहेर,असा प्रश्न निर्माण झाला आहे,

समग्र शिक्षा अभियान कार्यालय गटसाधन केंद्र इमारतीला पाणी गळती आहे. त्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना एकाच खोलीत दाटीवाटीने काम करावे लागत आहे तर दुसरीकडे अनेक सोयी सुविधांचा अभाव या ठिकाणी बघायला मिळत आहे. सतत पावसामुळे इमारतीत पाणी गळतीमुळे येथील सभागृहात व खोल्यांमध्ये पाणी साचले असून अनेक शालेय वस्तू खराब होत आहेत याला जवाबदार कोण?.वीज पुरवठा पण नियमित राहत नाही,इंटरनेट सुविधा नाही,कर्मचाऱ्यांना इंटरनेट संबंधित कामे करण्यास स्वतः मोबाईल च नेट वापरून कामे करावे लागते,किव्हा आपल्या सोई प्रमाणे बाहेर जाऊन काम करतात,

गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी फुलोरा उपक्रम,मागील दोन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू केले आहे,या उपक्रमात विद्यार्थ्यांना अद्यापन करण्याचा विविध पद्धतीचे वापर करण्यात येत आहे, त्यामध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्याच्या वापर करून शिक्षण दिले जातो परंतु तालुक्यातील 95% शाळा पावसामुळे गळत असल्याने बनवलेल् सर्व साहित्य खराब होते, वर्षातून दोनदा , तीनदा साहित्य तयार करावे लागते, त्यामुळे शिक्षकांना आर्थिक भुदंड पण भोगाव लागत आहे.

या कार्यालयात गटशिक्षणाधिकारी सह अंदाजे १५ कर्मचारी कार्यालयात कामावर आहेत. त्यामध्ये विषय तज्ञ पाच, विशेष शिक्षक पाच, केंद्रप्रमुख पाच, फुलोरा सुलभक तीन, गटशिक्षणाधिकारी एक असे अधिकारी कर्मचारी असून या ठिकाणी दोन हॉल, दोन स्टाफ खोली, एक स्टोअर रूम तर एक गटशिक्षण अधिकारी कार्यालय आहे. यामधील दोन्ही हॉल, एक स्टाफ रूम, स्टोर रूम हे पाण्याने गळत आहेत. तर शौचालयामध्ये पाण्याची सुविधा नाही ,दरवाजे फुटलेले, इमारतीतील सर्व खिडक्या तुटलेल्या, सफाई कामगार नाही शिपाई नाही,स्वतः कर्मचारी स्वच्छतेचा काम करतात, अस्वच्छतेचा अभाव तसेच टेबल खुर्च्या पुस्तके व इतर साहित्य पूर्णपणे पावसाने खराब होत आहेत याच जवाबदार कोण?. इमारतीच्या सभोवताली परिसर अस्वच्छ असल्याने दोन ते तीनदा सरपटणारे साप ऑफिसमध्ये आढळले आहेत यामुळे एकाद्या कर्मचाऱ्यांना काही झाल्यास जबाबदार कोण?. इमारतीच्या समोरील पटांगणामध्ये पावसाळ्यात नेहमीच पाणी साचतो आहे.

सदर गटसाधन केंद्र इमारतीची स्थापना १९९७ मध्ये झाली ईमारत लोकार्पण होऊन ३० वर्षे झाली आहे त्यावेळी ईमारतीचे उद्घाटन तत्कालीन नामदार विजयकुमार गावीत माजी राज्यमंत्री सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन व राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हापासून या इमारतीची एकदाही डागडूजगी करण्यात आलेली नाही. सध्या जीर्णावस्थेत इमारत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तालुक्याअंतर्गत अंदाजे ९५% जिल्हा परिषद शाळेची इमारत पावसाळ्यात पाणी गळतीवर असल्याची प्राथमिक माहिती आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेला एकच शिक्षक आहे’ तर पहिली ते आठवी पर्यंतच्या वर्गाला आहे.शिक्षक संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे,,

  •        समग्र शिक्षा विभागाचे कार्यकारी अभियंता भरडकर यांना या संदर्भात मागील वर्षी सांगितले होते ते म्हणाले दुरुस्तीच्या इस्टिमेट तयार करतो आणि दुरुस्ती करतो परंतु या गोष्टीला एक वर्ष ओलांडले आहे अजून पर्यंत काहीही झालेलं नाही.अधिकारी पण लोकप्रतिनिधी प्रमाणे आश्वासन द्यायला लागले की काय?असा प्रश्न निर्माण होत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here