बेडगाव घाटावरून प्रवास करतांना दुचाकी प्रवासी सतर्क राहण्याची गरज
कोरची
एका दिवसापूर्वी एका रानटी हत्तीने बेडगाव वनविभाग परिसरातील चरविदंड व लेकुरबोडी गावामध्ये शेतकऱ्यांच्या मका, केळी, भात शेतीचे नुकसान करत धुमाकूळ घातले. त्यामुळे नागरिकांमध्ये जंगल परिसरात शेतीचे व अन्य कामाने बाहेर पडण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर २० जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता दरम्यान शिक्षक सुनील नारनवरे रा. कोरची व कंत्राटदार रामलाल माकडे रा.कोरची हे कोरचीवरून खाजगी कामाने कुरखेड्याकडे चार चाकी वाहनाने निघाले तेव्हा बेडगाव घाटाच्या पहिल्या उतारावरील पुलाजवळील रस्त्याच्या मधोमध बिबट्या बसून असल्याचे दिसून आले. वेळीच सतर्कता बाळगल्यामुळे कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडले नाही.
परंतु बिबीटला बघून गाडीत बसलेले शिक्षक नारनवरे, कंत्राटदार माकडे यांच्या मनात भीती निर्माण झाली होती वाहनचालक माकडे यांनी चार चाकी वाहन थांबवले होते. काही वेळात बिबट्या रोडाच्या बाजूला होऊन रोडाच्या खाली जाऊन बसले. तेव्हा त्या बिबट्याची मोबाईलवर व्हिडिओ काढली आणि कोरची समाचार व्हाट्स अप ग्रुपवर टाकली. त्यामुळे सोशल मीडियावर या बिबट्याच्या व्हिडिओबाबद चांगलीच चर्चा सुरू आहे. तसेच नियमित कुरखेडा ते कोरची या मार्गाने प्रवेश करणाऱ्या प्रवासी नागरिकांना या पूर्वी सुद्धा या घाटावर बिबट्याचे दर्शन झाले होते मात्र याबाबद अनेकांना माहिती नव्हती परंतु आता ही व्हिडीओ बघून प्रवास करण्यासाठी प्रवासी लोकांना भीती निर्माण झाली आहे.
बेडगाव घाट नऊ किलोमीटरचा असून घनदाट जंगलाने व्यापलेला आहे ६० ते ८० फुटाची दरी आहे. घाटावरील रस्त्यावर अनेक चढाव आहेत तर नागमोडी वडण आहे त्यामुळे चार चाकी दुचाकी वाहन या ठिकाणाहून हळू जात येत असतात अशावेळी अशा वन्य प्राण्यांचे समोरा-समोर येणे जीवाला धोकादायक आहे या जंगलामध्ये सध्या रानटी हत्ती, अस्वल, रानटी डुक्कर, बिबट, नीलगाय अशा वन्य प्राणांचे जंगलपरिसरात वावर आहे. यासंदर्भामध्ये बेडगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले बेडगाव घाटावर बिबट्याचे वास्तव्य आहे त्यामुळे नागरिकांनी एकटे या मार्गाने प्रवास करू नये तसेच पावसाळा सुरू झाला आहे शेतीच्या कामाने जंगलामध्ये एकटे न जाता समूहाने जावे तसेच घाटातील जंगलात अनेक जन रानभाज्यासाठी जातात तर समूहाने जावे विनाकामाणे फिरू नये असे प्रवासी नागरिकांना व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.


