Home क्राईम कोरची पोलीस स्टेशन परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

कोरची पोलीस स्टेशन परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

0
30

 

 

कोरची

कोरची पोलीस स्टेशन जंगल परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. कोरची पोलीस स्टेशन येथील ड्युटीवर असलेल्या एका पोलीस सेंट्रीला बुधवारच्या पहाटे दोन ते तीन वाजता सुमारास बिबट दिसले आहे. त्या बिबट्याचे फोटो लगेच मोबाईलमध्ये काढली असून सकाळी परिसरातील पोलीस कर्मचारी व नागरिकांना सतर्क राहण्यासाठी याची माहिती दिली तेव्हा अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरचीला चारही दिशेने जंगल परिसर असल्याने जंगलातील प्राण्यांचा मुक्त संचार आहे मागील काही दिवसापासून बिबट्याचे मुक्त संचार होत असल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात सुद्धा आले होते. पोलीस स्टेशन कोरची परिसरात तहसील कार्यालय, वनश्री महाविद्यालय, शासकीय आश्रम शाळा, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, आदिवासी मुलांचे व मुलींचे वस्तीगृह, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, गट साधन केंद्र असे शासकीय निम शासकीय कार्यालय असून परिसरात अनेक नागरिकांची घरे आहेत. रात्री उशिरापर्यंत कोरची-भीमपूर मार्गाने नागरिकांची रस्त्याने ये-जा सुरू असते तसेच पहाटे थंडीच्या दिवसात फिरायला व वायामला जाणारे नागरिक, महाविद्यालयात जाणारी विद्यार्थी जंगल परिसरात सरपण गोळा करण्यास जाणाऱ्या नागरिकांसाठी आता धोका निर्माण झालेला आहे.

बेडगाव वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. बेडगाव वन विभागाचे अधिकारी एल एम ठाकरे यांना यासंदर्भात विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की तालुका परिसरातील जंगलात दोन ते तीन बिबट असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यापूर्वी टेमली व सोनपूर येथील दोन पाळीव गाई बिबट्यांनी ठार केले आहे. त्यामुळे या बिबट्याचे बंदोबस्त होईपर्यंत नागरिकांनी समूहाने फिरावे, एकटे फिरू नये, सरपण गोळा करायला जायचं असेल तर समूहाने जावे एकटे जाऊ नये, सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here