![]()
११ ते १५ जूनदरम्यान विविध शासकीय व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही उपस्थिती
गडचिरोली :
अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचा ११ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत नागपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे. या दौऱ्यात ते सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार गुरुवारी (११ जून) सकाळी ९ वाजता अहेरी येथील राजवाडा निवासस्थानातून मोटारीने चंद्रपूरमार्गे नागपूरकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी ११ वाजता चंद्रपूर येथील जनता कॉलेजमध्ये शिक्षण महर्षी अशोकजी जिवतोडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर नागपूरकडे रवाना होऊन दुपारी १ वाजता नागपूर येथे आगमन होणार असून तेथे मुक्काम राहणार आहे.
१२ व १३ जून रोजी आमदार आत्राम नागपूर येथील निवासस्थानी विविध बैठका व भेटीगाठी घेणार आहेत. त्यानंतर रविवारी (१४ जून) सकाळी नागपूरहून गडचिरोलीकडे प्रयाण करून दुपारी १२ वाजता गडचिरोली येथे पोहोचणार असून तेथे मुक्काम राहील.
सोमवारी (१५ जून) दुपारी २ वाजता गडचिरोली येथील निवासस्थानावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होऊन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर नागपूरकडे प्रयाण करण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे.
दरम्यान, शासनाने आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांना संपूर्ण महाराष्ट्रात ‘Y’ तर नक्षलप्रभावित भागात ‘Z’ श्रेणीची सुरक्षा प्रदान केली असल्याने संबंधित पोलीस यंत्रणांना आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
या संपूर्ण दौऱ्यात स्वीय सहाय्यक राजेश पुरी व किशोर खामनकर हे आमदार आत्राम यांच्यासोबत राहणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. :::