गडचिरोली, दि. १५ : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे गुरुवार, दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी ११.०० वाजता त्यांचे गडचिरोली येथे आगमन होणार असून, पोलीस मुख्यालय येथे आयोजित रोजगार मेळावा तसेच वाहन लोकार्पण कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. या कार्यक्रमात विविध विभागांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यानंतर दुपारी १२.०० वाजता त्यांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. दुपारी २.१५ वाजता ते हेलिकॉप्टरद्वारे नागपूरकडे प्रयाण करणार आहेत.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली असून, संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.