गोंडवाना विद्यापीठात शिक्षक क्रीडा व कला महोत्सव
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या शिक्षक वृंद यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामध्ये खेळा प्रती आणि कलेप्रती उत्साह निर्माण व्हावा, याकरिता गोंडवाना विद्यापीठातील तसेच संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक वृंद यांच्याकरिता तीन दिवसीय शिक्षक क्रीडा व कला महोत्सव कलादर्पण 2026 संपन्न होत आहे. या महोत्सवाच्या संस्कृतीक कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक, 14 मार्च 2026, रोजी सकाळी 11 वासता, गोंडवाना विद्यापीठात होणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, राहणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि क्रीडा संचालक डॉ. अनिता लोखंडे यांनी केले आहे.