Home Breaking News गडबामणी येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात; सल्लागांगरा स्मृतीचे उद्घाटन

गडबामणी येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात; सल्लागांगरा स्मृतीचे उद्घाटन

0
20

 

भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांची प्रमुख उपस्थिती; आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग

अहेरी तालुक्यातील गडबामणी येथे जय पेरसापेन मंडळाच्या वतीने क्रांतिवीर Baburao Shedmake जयंती तसेच सल्लागांगरा स्मृती उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा Gondwana University च्या सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी अध्यक्षस्थान भूषविले.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर सल्लागांगरा स्मृतीचे उद्घाटन करण्यात आले तसेच क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी पारंपरिक आदिवासी वाद्ये व गोंडी नृत्यांच्या माध्यमातून भाग्यश्रीताई आत्राम यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

कार्यक्रमाला नगरसेवक अमोल मुक्कावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवर, पोलीस पाटील आनंदराव सुनतकर, आनंदराव मडावी, सुरेश पेंदाम, नामदेव दब्बा, मल्लाजी सिडाम, ईश्वर सिडाम, प्रभाकर कुसराम, रमेश कुसराम, अमोल रामटेके, अनुराग बेझुलवार, सुमित मोतकुरवार, पुष्पाताई दब्बा, मनिषाताई आलाम, प्रतिमाताई मडावी, शोभाताई सिडाम यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव-भगिनी, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) म्हणाल्या की, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके हे आदिवासी समाजाच्या शौर्य, स्वाभिमान आणि संघर्षाचे प्रतीक आहेत. समाजातील अज्ञान, अन्याय व भेदभाव दूर करण्यासाठी शिक्षण, एकता आणि सामाजिक न्यायासाठी उभे राहणे गरजेचे आहे. युवकांनी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी कार्य केले पाहिजे. इतिहास नेहमी समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्यांचाच लिहिला जातो, असेही त्या म्हणाल्या.जयंतीनिमित्त समाजजागृतीचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी गोंडी पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here