Home Breaking News गडचिरोली विधानसभा मतदारसंघासाठी विकासाची मोठी झेप; रस्ते व पुलांच्या कामांसाठी ४३ कोटी...

गडचिरोली विधानसभा मतदारसंघासाठी विकासाची मोठी झेप; रस्ते व पुलांच्या कामांसाठी ४३ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर

0
25

गडचिरोली विधानसभा मतदारसंघासाठी विकासाची मोठी झेप; रस्ते व पुलांच्या कामांसाठी ४३ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत मतदारसंघातील विविध रस्ते सुधारणा आणि नवीन पुलांच्या बांधकामासाठी तब्बल ४,३४०.७३ लाख (४३.४० कोटी) रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांमुळे जिल्ह्याचा ग्रामीण भागाशी संपर्क अधिक भक्कम होणार असून, दळणवळणाची सुविधा अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि महायुती सरकारच्या सहकार्यातून हा निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने चामोर्शी, धानोरा आणि गडचिरोली तालुक्यातील १३ महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. यात चामोर्शी-मुरखळा-मार्कंडादेव रस्ता, आष्टी-कुनघाडा मार्ग, चातगाव-कारवाफा रस्ता आणि भाडभिडी-घोट यांसारख्या प्रमुख मार्गांच्या सुधारणेसाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जाणार आहे.

रस्त्यांसोबतच दुर्गम भागातील नागरिकांची पावसाळ्यातील गैरसोय टाळण्यासाठी पुलांच्या बांधकामावर विशेष भर देण्यात आला आहे. धानोरा तालुक्यातील सांवगा ते मंगेवाडा, पयडी ते आलकनार आणि आलकनार ते कनेली या भागातील पुलांच्या कामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच तलोधी-मोकासा-येदानूर रस्त्यावरील मुरमुरी गावाजवळील पुलाचे पुनर्बांधकामही केले जाणार आहे.

या विकासकामामुळे केवळ प्रवास सुखकर होणार नाही, तर ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांना वेळेवर मदत मिळण्यास मोठी मदत होणार आहे. मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आपण सदैव कटिबद्ध असून या महत्त्वपूर्ण निधीस मंजुरी दिल्याबद्दल आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. या निर्णयामुळे संपूर्ण गडचिरोली विधानसभा मतदारसंघात आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी या विकासकामांचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here