रजत वाळके यांचा बामसेफच्या वतीने जाहीर सत्कार
गडचिरोली – रजत सुनिल वाळके यांनी युपिएससी परिक्षेत आल इंडिया मध्ये ५१४ वी रॅक घेऊन परिक्षा पास केल्याबद्दल बामसेफच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . मनात जिद्द कायम ठेवून साधारण कुटूंबातील रजतने वडीलाचे छत्र हरपले असतांना आईच्या प्रेरणेतून आयएएस परिक्षा पास केल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रजतच्या यशाबद्दल बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष प्रमोद राऊत , विदर्भ राज्य निर्माण समितीचे डॉ . सुरेशचंद्र डोंगरवार , बहुजन मुक्ती पार्टीचे नरेंद्र शेंडे , आरपिआय चे उपाध्यक्ष दशरथ साखरे , माजी नगरसेवक तुळशिराम सहारे , विदर्भ राज्य निर्माण समितीचे वनकर , प्राचार्य चव्हान सर , सम्राट अशोक विहाराच्या अध्यक्षा निशा बोदेले , प्रेमलता कान्हेकर , निता उंदिरवाडे , अरुणा उंदिरवाडे , शुभांगी देवगडे , भारत शेंडे , अमिता भैसारे , माया मेश्राम आदिनी सत्कार केला .