Home Breaking News गडचिरोली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची नियुक्ती

गडचिरोली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची नियुक्ती

0
34

 

१९८९ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल सध्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या (एमओएसजेई) अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागात (डीईपीडब्ल्यूडी) सचिव म्हणून काम करतात. संगणक प्रणालींमध्ये तज्ज्ञ असलेले अग्रवाल यांनी नवी दिल्लीत सचिवांसह अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

गडचिरोली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची नियुक्ती

गडचिरोली, दि. 23 : गडचिरोली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी राज्याचे मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे .

पूर्वी गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. मिलिंद म्हैसकर कार्यरत होते. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदलानुसार आता श्री. राजेश अग्रवाल हे गडचिरोली जिल्ह्याचे नवीन पालक सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here