
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात सिरोंचा वरून रेगुंटाला जाणारी एसटी महामंडळाची बस एका मोठ्या नाल्याच्या वळण मार्गावर रात्री अर्धवट अवस्थेत उलटली मात्र प्रवाशांचे नशीब बलवत्तर असल्याने गंभीर परिस्थितीत उलटूनही यात जीवित हानी झाली नाही..
कंबालपेटा नाला ते टेकडा दरम्यान मोठ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे.
कच्चा वळण मार्ग त्यात तयार करण्यात आला असून सहा फुटापर्यंत पाणी असलेल्या या नाल्याच्या वळण मार्गावर रात्री 30 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस अचानक कडेला गेली आणि उलटता उलटता तिथेच लटकली ड्रायव्हरने घटनास्थळावरून तात्काळ उडी मारून पळ काढला..
प्रवाशांनी एका खिडकीतून बाहेर उतरून आपला जीव वाचवला..
अंधारात बस जर पाण्यात बुडाली असती तर तिथे प्रवाशांना मदतही मिळाली नसती गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती हेच घटनास्थळाचं चित्र पाहून दिसून येत आहे