Home Breaking News लाहेरी शासकीय आश्रम शाळेतील तब्बल ७० विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास...

लाहेरी शासकीय आश्रम शाळेतील तब्बल ७० विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास ; ७० विद्यार्थ्यांना विषबाधा उपचारासाठी रुग्णालयात दाखल

0
39

गडचिरोलीः एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील तब्बल ७० विद्यार्थ्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्याने एकच खडबड उडाली आहे.

भामरागड प्रकल्प कार्यालय अंतर्गत येत असलेल्या लाहेरी येथील शासकीय आश्रम शाळेतील तब्बल सत्तर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होत असल्याने तब्बल ७० विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० विद्यार्थी आणि भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात ४० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे भामरागड येथे उपचार अर्थ दाखल केलेल्या चाळीस विद्यार्थ्यांपैकी ०१ विद्यार्थी आणि १० विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलविण्यात आल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार मंगळवारी (२७ जानेवारी) रोजी रात्रीच्या सुमारास जेवण केल्यानंतर शासकीय आश्रम शाळा लहरी येथील एका विद्यार्थ्याला पोटदुखीचा त्रास झाला होता.२८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एका मागून एक असे तब्बल ७० विद्यार्थ्यांना असाच त्रास होऊ लागल्याने येथील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येते उपचारार्थ दाखल दखल केले. ४० विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले.

विशेष म्हणजे भामरागड ग्रामीण रुग्णालयात २२ मुले आणि १८ मुली असे एकूण ४० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असतानाच ०१ मुलगी आणि ०१ मुलगा असे ०२ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले असल्याची माहिती सहाय्यक प्रकल्पाधिकारी रोषणा चव्हाण यांनी दिली आहे.

लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत तब्बल २३० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यातील तब्बल ७० विद्यार्थ्यांची अचानक तब्येत खालावल्याने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच येथील प्रकल्प अधिकारी अमर राऊत, तहसीलदार किशोर बागडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशन चव्हाण तसेच आदी अधिकाऱ्यांनी भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या च मुला बोलावून उर्वरित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.
सध्या लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० आणि भामरागड ग्रामीण रुग्णालयात ३८ आणि अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात ०२ असे एकूण ७० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे. या आश्रम शाळेतील उर्वरित विद्यार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निग्राणीत ठेवले असून अन्नातून विषबाधा झाली तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. चौकशीनंतरच नेमकं प्रकार समोर येणार आहे.
घेत असून त्यातील तब्बल ७० विद्यार्थ्यांची अचानक तब्येत खालावल्याने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच येथील प्रकल्प अधिकारी अमर राऊत, तहसीलदार किशोर बागडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशन चव्हाण तसेच आदी अधिकाऱ्यांनी भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या च मुला बोलावून उर्वरित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.
सध्या लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० आणि भामरागड ग्रामीण रुग्णालयात ३८ आणि अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात ०२ असे एकूण ७० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे. या आश्रम शाळेतील उर्वरित विद्यार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निग्रणीत ठेवले असून अन्नातून विषबाधा झाली तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. चौकशीनंतरच नेमकं प्रकार समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here