Home Breaking News नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या रानम्हशींना कोलामार्का या अभयारण्यातून नवसंजीवनी ; !...

नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या रानम्हशींना कोलामार्का या अभयारण्यातून नवसंजीवनी ; ! कोलामार्का ठरणार रानम्हशींचे नवे माहेरघर

0
27

आनंद दहागावकर,मुख्यसंपादक ; महाExpres.

गडचिरोली  : सिरोंचा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत अभयारण्याचा दर्जा देण्यास नुकतीच मंजुरी दिली. या निर्णयामुळे अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे रानम्हशींचे अभयारण्य उदयास येणार आहे. यापूर्वीच या वनपरिक्षेत्रात राज्यातील एकमेव शासकीय हत्तीकॅम्प असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी उसळत आहे. आता रानम्हशींना नवे माहेरघर मिळत असल्यामुळे पर्यटकांना हत्तींसह रानम्हशींचे दर्शन घेता येणार आहे.

निसर्गप्रेमी आणि वन्यजीवप्रेमींसाठी ही अनोखी भेट ठरणार आहे.

सिरोंचा वनविभागात जैवविविधतेचे भरमार असून भारतात आकाराने तिसऱ्या क्रमांकाच्या रानम्हशी याच वनविभागात आहेत. सध्या नामशेष होणारा व छत्तीसगड राज्याचे राज्यप्राणी रानम्हशी
महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील इंद्रावती नदीलगतच्या भागात आढळून येतात. रानम्हशींचा वावर कमलापूर वनपरिक्षेत्रात असल्याने यातील काही भाग कोलामार्का राखीव संवर्धन घोषित करण्यात आले होते. ६ जून २०२२ रोजी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्र, कोलामार्का आणि विस्तारित लोणार या तीन संवर्धन राखीव क्षेत्राला मान्यता देण्यात आली होती.

महाराष्ट्रात १९९० मध्ये – चंद्रपूर, गडचिरोलीच्या जंगलामध्ये रानम्हशी सापडल्याचे पुरावे आहेत. २०११ मध्ये ‘नॅशनल बोर्ड ऑफ वाइल्ड लॅब’ मध्ये कोलामार्का हे ‘राखीव वनक्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले. त्या अनुषंगाने नोव्हेंबर २०१२ मध्ये पाच वर्षांचा – नियोजन आराखडा तयार करून ८ जानेवारी २०१३ ला कोलामार्का हे राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. ऑगस्ट २०१५ मध्ये व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आले. या राखीव संवर्धन क्षेत्रात बिबट, जंगली कुत्रे, चौशिंगा, गिधाड, शेकरू अशा विविध १५ प्रकारचे प्राणी येथे आढळून येत असल्याने या क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तेव्हापासूनच याठिकाणी रानम्हशीचे संवर्धन करण्यात येत आहे. त्यासाठी कमलापूर परिसरातील आठ बेरोजगार युवकांची मॉनेटरिंग टीम तयार करून त्यांच्याकडून या राखीव संवर्धन क्षेत्रातील विविध कामे केले जात आहे. या मॉनेटरिंग टीममुळे राखीव संवर्धन क्षेत्रातील अद्ययावत माहिती मिळविणे शक्य झाले.

विशेष म्हणजे, नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि भारतात आकाराने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रानम्हशींना या अभयारण्यातून नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे कमलापूर येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

अद्ययावत माहिती मिळविणे शक्य झाले. विशेष म्हणजे, नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि भारतात आकाराने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रानम्हशींना

या अभयारण्यातून नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे कमलापूर येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

देशातील रानम्हशींचे एकमेव अधिवास?

आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त म्हणून गडचिरोलीची ओळख असून, या जिल्ह्यात सद्यः स्थितीत चपराळा आणि भामरागड असे दोन अभयारण्य होते. आता कोलामार्काला अभयारण्याचा दर्जा देण्यास मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यातील हे तिसरे अभयारण्य ठरणार आहे. विशेष म्हणजे देशातील रानम्हशींचे एकमेव अधिवास असणारे ठिकाण म्हणून कोलामार्काकडे बघितले जाणार आहे.

कुर्ता बेटाजवळ मुख्य प्रभाग

कोलामार्का अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ १८०.७२ चौरस किलोमीटर एवढे आहे. या परिसरात २ हजार १२२ लोकसंख्या असलेली चिटवेली, चिंतारेव, तोंडेर, नैनगुडम, मोदूमडगू, भंगारामपेठा, दामरंचा, वेलगूर अशी आठ गावे आहेत. कमलापूरलगतच्या इंद्रावती नदीपलीकडे छत्तीसगड राज्याची सीमा आहे. इंद्रावती नदीच्या दोन्ही बाजूला रानम्हशीकरिता प्रचूर संख्येमध्ये गवत उपलब्ध असल्याने रानम्हशी या परिसरात मुक्तसंचार करतात. इंद्रावती नदीच्या पात्रात मधोमध बेटावर कुर्ता नावाचे गाव आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात रानम्हशी आढळतात. नदीपलीकडे छत्तीसगड राज्यात टेकामेटाजवळ ‘ इंद्रावती राष्ट्रीय उद्यान’ देखील आहे. एकेकाळी हा परिसर नक्षलवाद्यांचा ‘रेस्ट झोन’ होता. त्यामुळे या परिसरात मॉनेटरिंग करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here