Home Breaking News अहेरी पोलीस ॲक्शन मोडवर आलापल्लीत दारू विक्रेत्यांवर कारवाई; ३ लाख ३३ हजारांचा...

अहेरी पोलीस ॲक्शन मोडवर आलापल्लीत दारू विक्रेत्यांवर कारवाई; ३ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त.!!

0
34
आलापल्लीत दारू विक्रेत्यांवर कारवाई; ३ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली : अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी अहेरी पोलिसांनी आलापल्ली येथे धाड टाकली. या कारवाईत नरेश मिसाल, वनिता मिसाल आणि सुशीला ईरबत्तनवार या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकूण ३,३३,१८० रुपयांचा देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मुखबिराच्या खात्रीशीर माहितीवरून दि. २ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत आरोपींच्या वार्ड क्र. ५, आलापल्ली येथील घरी पोलिसांनी छापा टाकला. तपासात बॅरल प्रीमियम व्हिस्की, ब्लॅक बकार्डी, ओल्ड मोंक, रॉयल स्टॅग, ओकस्मिथ, रॉकेट संत्रा देशी दारू आदी विविध बँडची १८० एमएल, ५०० एमएल, ९० एमएल, २ लिटर मापाची एकूण अनेक बाटल्या जप्त झाल्या. यात रॉयल स्टॅग सुपीरियर २००० एमएल च्या ३५ बाटल्या (९८,००० रुपये) आणि रॉकेट संत्रा ९० एमएल च्या ६४६ बाटल्या (२५,८४० रुपये) यांसारखा मोठा साठा होता.अप. क्र. ००६/२०२६, कलम ६५(ई), ८३ म. दा. काअन्वये फिर्यादी पोउपनि. चैतन्य घावटे यांनी गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हर्षल एकरे, सपोनि. मंगेश वळवी, पोउपनि. चैतन्य घावटे, पोहवा विडपी, प्रशांत कांबळे, राकेश करमे, पोसिपाई दरौ, जनबंधू, मपोहवा पेंदाम, राठोड यांनी ही कारवाई केली. तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here