Home Breaking News *३ नोव्हेंबरला लोकशाही दिन ;* *जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी...

*३ नोव्हेंबरला लोकशाही दिन ;* *जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी सादर करण्याचे आवाहन*

0
44

*दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकृती; सामूहिक नव्हे, केवळ वैयक्तिक तक्रारींवर होणार विचार*

गडचिरोली, दि.२८ : माहे नोव्हेंबर महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन ३ नोव्हेंबर २०२५ रोजी (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दुपारी 3.00 वाजता करण्यात आले आहे.

या दिवशी तक्रार अर्ज स्वीकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

तालुका पातळीवरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण न झाल्यास अशा तक्रारदारांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनासाठी अर्ज सादर करावेत. या अर्जात तालुका स्तरावरील अहवालाची प्रत व टोकन क्रमांक जोडणे आवश्यक आहे. तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र 1 अ ते 1 ड) दोन प्रतींमध्ये सादर करावे लागतील.

तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. सामूहिक स्वरूपाचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा लोकशाही दिनाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here