Home आरमोरी श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी येथे  “जागतिक परिचर्या दिवस” साजरा...

श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी येथे  “जागतिक परिचर्या दिवस” साजरा करण्यात आले.

0
27

 

 

श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी येथे आज दिनांक १२/०५/२०२३ रोजी “जागतिक परिचर्या दिवस” साजरा करण्यात आले. अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक श्री. सुधाकर साळवे सर उपस्थित होते. व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमोल धात्रक , चंदूजी वडपलीवार व संजय कापकर हे उपस्थित होते. या प्रसंगी जागतिक स्तरावर मातृदिन, पितृदिन आणि आणखी काही दिवस साजरे केले जातात. तसेच रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. १९७१ मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला, तो दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून संपूर्ण जगात १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

डॉ. अमोल धात्रक यांनी म्हंटले की, फ्लोरेन्स नायटिंगल या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या. तरीही त्यांनी आपले सर्व जीवन रुग्णसेवेला अर्पण करण्याचा निर्णय घेतला. अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. लंडनमध्ये त्यांनी केलेल्या रुग्णसेवेमुळे सैनिकांचा मृत्यू दर ही ६९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आला होता. नायटिंगल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करत असत. रात्री हातात लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असल्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” असेही म्हटले जात असे.

प्राचार्या पूनम नारणवरे यांनी म्हंटले की, कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका या अहोरात्र सेवा करीत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे, त्यांना आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत असतात. आताच्या घडीलाही करोनासारख्या महाभयंकर संकटकाळात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. कुटुंबांची, मुलांची, प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून परिचारिका आपली सेवा अत्यंत चोखपणे बजावत आहेत. अनेक रुग्णालयातील परिचारिकांनी तर गेले कित्येक दिवस आपल्या घरीदेखील गेल्या नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही.

कु. दुर्गा बनसोड व चाँदनी गोंगले यांनी संचालन आणि निशिध करंबे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षकवंदृ प्राचार्या – कु. पूनम नारणवरे , कु. नेहा लाचरवार, कु. शिवानी भणारे ,कु. काजल बावणे , कु. नितू वालदे , कु. जूव्ही नैताम श्री. भूषण ठकार, स्वप्नील धात्रक, सुनिता हेडाऊ, अल्का मारबते, शंकर मैन्द , वासुदेव फुलबांधे यांचे सहाकर्य लाभले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here