Home आरमोरी जात प्रमाणपत्राचा आरमोरी पॅटर्न ….

जात प्रमाणपत्राचा आरमोरी पॅटर्न ….

0
32

 

महसूल प्रशासन आणि शिक्षकच बनले विद्यार्थ्यांचे पालक

एका दिवसातच विद्यार्थ्यांना शाळेमध्येच मिळते प्रमाणपत्र

 

आरमोरी पॅटर्न गडचिरोली जिल्हयासह राज्यभरात ठरणार अभिनव उपक्रम

 

आरमोरी :- जातीचे प्रमाणपत्र हा प्रयेक विद्यार्थ्यासाठी महत्वाचा दस्ताएवेज मानला जातो. दहावी बारावी नंतर जातीच्या प्रमाणपत्राची गरज भासते. मात्र जातीचें प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गरीब व अशिक्षित असलेल्या पालकाना आवश्यक असलेल्या कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठीं करावी लागणारी कसरत व कार्यालयात वारंवार मारावे लागणारे हेलपाटे आणि प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणारी दिरंगाई टाळण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओमकार पवार यांनी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एका दिवसात जातीचें प्रमाणपत्र देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे . त्यानूसार हे जातीच्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारे कागदपत्र स्वतः तालुका प्रशासन काढून एका दिवसातच विद्यार्थ्यांच्या हाती जातीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

 

 

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी म्हणुन ओमकार पवार (आय ए एस) हे महिनाभरासठी आरमोरी येथे रुजू होताच त्यांनी जात प्रमाणपत्र देण्याचा अभिनव आरमोरी पॅटर्न राबविला आहे. आरमोरी तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांचे पालक अशिक्षित, गरीब आहेतं . जे मोलमजुरी करूण पोट भरतात अशा पालकांच्या वर्ग ५ ते ७ तसेच वर्ग ८ ते १० मध्ये शिकत असलेल्या अनुसुचीत जाती,

अनुसुचीत जमाती व इतर प्रवर्गातील ज्या विदयार्थ्यांनी अजुनपर्यंत जातीचे दाखले काढले नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना जातीचे दाखले निर्गमीत करण्याकरीता त्यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला.त्यानुसार जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांना कुठलीही दगदग करावी लागणार नाही. पालकांना कुठलाही खर्च करावा लागणार नाही . जातप्रमाणपत्र देण्याची जबाबदारी शिक्षक व महसूल प्रशासनानी स्वीकारली आहे .

 

विद्यार्थ्याचे पालक बनुन शिक्षक व महसुल प्रशासन जातीच्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारे रीनंबरिंग पर्चा, पि वन, अधिकार अभिलेख पंजी, गाव नमुना आठ, बंदोबस्त मिसल, शेतीचा सातबारा, रहिवाशी दाखले व ईतर सर्व कागदपत्र महसूल प्रशासन स्वतःची यंत्रणा राबवून व रेकॉर्ड तपासून काढत आहे.व सर्व कागदपत्र काढून एका दिवसात जातीचें प्रमाणपत्र विद्यार्थ्याच्या हाती देण्याची प्रक्रिया सुरु झाली असुन २६८ जातीचें प्रमाणपत्र विद्यार्थ्याच्या हातीही देण्यात आले आहे.

ज्या विद्यार्थ्याकडे जातीचे प्रमाणपत्र नाही अशा गरजु विद्यार्थ्यांना

जातीचें प्रमाणपत्र देण्यासाठी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शाळेतून मागविण्यात येत आहेत. आरमोरी तालुक्यातील ६८ शाळेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र काढणे सुरु झाले आहे. त्यासाठी लागणारे विविध दाखले मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात विविध १० टेबल तयार करण्यात आले आहेत. तलाठी , मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख व तहसील कार्यालयाचे कर्मचारी हि यंत्रणा यासाठी कामाला लागली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी ओमकार पवार हे स्वतः लक्ष घालत आहेः. यासाठी त्यांनी प्रशासकीय यंत्रणा कामाला लाऊन सकाळ पासुन तर रात्रौ उशिरा पर्यंत ते जातीने लक्ष देत आहेत.

पहिल्या टप्प्यात त्यांनी आरमोरी तालुक्यात ५०० विद्यार्थ्याना जातीचें प्रमाणपत्र निगर्मित करण्याचा टार्गेट ठेवला असुन ५० टक्के पेक्षा जास्त जातीचें प्रमाणपत्र विद्यार्थ्याच्या हाती देण्यात आले आहे.

 

ओमकार पवार यांचा जात प्रमाणपत्र देण्याचा आरमोरी पॅटर्न यशस्वी झाला असुन त्यांची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. हा पॅटर्न संपूर्ण जिल्हाभर किंवा राज्यात राबविल्यास त्यांची आरमोरीच्या नावाने नक्कीच नोंद होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

 

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी शुक्रवारी आरमोरी येथील तहसील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्हयात काम करण्याची संधी मिळाली. जिल्हयात प्रशासकिय व सामजिक क्षेत्रात काम करण्यास भरपूर वाव आहे. दहावी नंतर विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्राची गरज भासते अशावेळी जातीच्या प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गरीब पालकाना कागदपत्राची जुळवाजुळव, यासाठी वेळ व पैसा खर्च होतो. हेलपाटे मारावे लागतात.. प्रस्ताव सादर केल्यावर त्रुट्या निघतात. पालकांना याची जाणीव नसते म्हणुन विद्यार्थ्याच्या पालकांना यात अलिप्त ठेऊन शिक्षकच शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जमा करायचे आणि महसुल प्रशासनाने जात प्रमापत्रासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करून त्यांना एका दिवसांत जातीचें प्रमाणपत्र देण्याचा नविन पॅटर्न राबविला. आणि हा यशस्वी सुद्धा झाला. जात प्रमाण पत्रासाठी शिक्षक आणि महसूल प्रशासन विद्यार्थ्यांच्या पालकाची भुमिका निभावत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तहसिलदार श्रीहरी माने हेही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here