कोरची
-येथून 15 किमी अंतरावर असलेल्या कोटरा येथे आदिवासी गोंड समाज सर्कल कोटराच्या तेराही गावांच्या सौजन्याने 16 फेब्रुवारी रोजी विरांगणा महाराणी दुर्गावती व क्रांतीसुर्य महानायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचा अनावरण सोहळा व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन बाजार चौक कोटरा येथे करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामसायजी कोरेटी तर उपाध्यक्ष कार्तिकराम मडावी तर उद्घाटक म्हणून सियारामजी हलामी ,झाडूरामजी हलामी व सहउद्घाटक म्हणून बलीयार मडावी तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट. प्राध्यापक दिनेश कुमार सहारे, आदिवासी समाजसेवक देवाजी तोफा, डॉक्टर राजू कोरेटी, ज्येष्ठ साहित्यिका उषाकिरण आत्राम ,नरेंद्रजी नैताम, दिनेश कोरेटी ,बाबुराव हिळको तर विशेष अतिथी म्हणून सदाराम नूरुटी, अनिल केरामी, इजामसाय काटेंगे तर प्रमुख अतिथी म्हणून सरील मडावी, मानसिंग नैताम ,मधुकर मेश्राम, जीवन नुरुटी ,तुलाराम मडावी, राहुल मलगाम, देवचंद दखने ,श्रीराम कल्लो, अलीसाय काटेंगे, कार्तिकराम मडावी, लीनाताई तांडेकर, संपत नैताम, प्रमोद कोवाची ,घासीराम हारामी ,जगदीश काटेंगे ,जुमेनसिंग होळी ,दुर्पाल नैताम, चमा धूर्वे ,दलसाय काटेंगे ,मंसाराम मडावी ,प्रेमलाल काटेंगे, दामसाय कोवाची ,धरमसाय कोवाची, उद्धवराव कोरेटी ,बलीराम मडावी ,सुनील अवसरे ,यशवंत दरवडे, तलवारसाय मडावी इत्यादी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.
आदिवासी गोंड समाज सर्कल कोटरा अंतर्गत येत असलेल्या तेराही गावातील लोक एकत्र होऊन मांदरी नृत्याच्या गजरात गावाच्या मुख्य रस्त्यावरून मान्यवरांचे स्वागत करीत समाजाची रॅली काढण्यात आली. वीरांगणा महाराणी दुर्गावती व क्रांतीसुर्य महानायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचा पुजनाचा कार्यक्रम मूर्तिपूजन राजिमसाय कल्लो राजवैद्य यांचे हस्ते करण्यात आले व ध्वजारोहण सामसायजी कोरेटी मोकाशी यांच्या हस्ते करून मूर्तीचे अनावरण कचरीताई काटेंगे व सरपंच शांतीबाई मडावी यांच्या हस्ते करण्यात आले.
आदिवासी गोंड समाज सर्कल कोटराच्या तेराही गावांमधून उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर राजू कोरेटी नांदळी (MBBS, MD,MS,), ऍड. प्रा. दिनेशकुमार सहारे कोटरा(BA,LLB, LLM,NET).डॉक्टर देवेंद्र मडावी हितकसा (MBBS) तथा ज्येष्ठ साहित्यिका उषाकिरण आत्राम यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदिवासी समाजसेवक देवाजी तोफा यांनी पेसा वन हक्क, कायदा ,ग्रामसभा व अंमलबजावणी या विषयावर मावा नाटे मावा राज, गल्ली टू दिल्ली पर्यंतचा प्रवास कसा करायचा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍड. प्रा. दिनेशकुमार सहारे यांनी आदिवासींकरिता विशेष तरतुदी कायदे व अंमलबजावणी या विषयावर गोंडी भाषेत मार्गदर्शन केल्याने उपस्थित लोकांना कायदेविषयक मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. कुणालाही कायदेविषयक शिक्षण घ्यायचे असल्यास आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे यावेळी विषद केले.
ज्येष्ठ साहित्यिका उषाकिरण आत्राम यांनी आदिवासी महिलांचे हक्क अधिकार व सामाजिक नेतृत्व या विषयावर समाजासमोर आपले विचार मांडले.
डॉक्टर राजू कोरेटी यांनी आदिवासी समाज व त्यांची आरोग्याबाबत विचारसरणी यावर आपले मत मांडले. डॉक्टर देवेंद्र मडावी यांनी परिस्थितीवर मात करत कसे उच्च शिक्षण घ्यावे याचे सविस्तर असे विवेचन केले.
याप्रसंगी नरेंद्रजी नैताम मोहल्ला, दिनेशजी कोरेटी छुरीया, बाबुराव हिळको गोठानपार , सियाराम हलामी ,अनिल केरामी यांनी सुद्धा उपस्थित तेराही गावातील समाजास सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुलाराम मडावी सूत्रसंचालन रमेश शहारे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीराम कल्लो झेंडेपार यांनी मांनले.
आदिवासी गोंड समाज सर्कल कोटरा च्या तेराही गावातील अध्यक्ष, सचिव व सर्व गावकरी युवा, युवती यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास तन-मन-धनाने सहकार्य केले.


