Home आरमोरी .. आणि साहेबांप्रती कार्यकर्त्यांमध्ये आदर पुन्हा वाढले.

.. आणि साहेबांप्रती कार्यकर्त्यांमध्ये आदर पुन्हा वाढले.

0
34

 

युवामंच व प्रकाश चषक आयोजन समिती यांच्या वतीने आरमोरी शहरात मोठ्या उत्साहात रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दि. २२/११/२०२३ पासुन जिल्ह्यातीलच नाही तर दुसऱ्या जिल्ह्यातील देखील अनेक टोकातून अनेक खेडाळू आरमोरी शहरात मोठ्या हिरहिरीने खेळण्यासाठी येत आहेत. अशातच काल परवा अहेरी तालुक्यातील चिंचगुडी गावातील चमुचा सामना गडचिरोलीतील चवेला संघासोबत झाला. सामना खुप सुंदर झाला. चींचगुडी संघाने अतिशय चांगली खेळी केली परंतु त्यांना विजय संपादित करता आले नाही. १३०किमी. दूरवरून पीक – अप गाडीने येऊन विजय न मिळाल्याने संपूर्ण चमुचा हिरमोड झाला होता.

अश्यातच सन्माननीय प्रकाश सावकार पोरेड्डीवार हे स्वतः मैदानावर हजर राहुन सामना बघत होते. चींचगुडी चमुची सामन्यामधील जिद्द त्यांचे जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न त्यांनी बघितले होते. चांगले प्रदर्शन करून देखील पराभव झाल्याने हिरमोड झालेल्या चिंचगुडी संघातील खेळाडुंना त्यांनी आपल्या जवळ बोलावले. त्याच्याशी बोलून त्यांचे मनोबल वाढवले. तसेच त्यांना स्वतःकडून रोख रक्कम पारितोषिक देऊन चांगली लढत दिल्याबद्दल सन्मानित देखील केले.

एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर पुढीलवर्षी आपल्याकडून खेळण्यासाठी त्यांना आमंत्रण देखील दिले. इतका प्रेम बघुन चींचगुडी संघातील खेळाडू भारावून गेले व आम्हासारख्या दुर्गम भागातील खेळाडुंना आरमोरी सारख्या शहरात खेळायला भेटणे ही खुप भाग्याची गोष्ट आहे, इथे खेळून खुप आनंदी वाटले आणि आम्ही हरल्यानंतर देखील मनाने श्रीमंत असलेल्या एवढ्या मोठ्या व्यक्तीने ज्यांच आम्ही आजपर्यंत फक्त नावच ऐकत होतो त्यांनी स्वतः आम्हाला सन्मानित केले त्याबद्दलची कृतज्ञता त्यांनी शब्दातून व्यक्त केली. युवामंच व आरमोरीकरांनी दिलेल्या प्रेमाचे ऋणी होऊन पुढल्या वर्षी चांगला सराव करून पुन्हा खेळायला येण्याची ग्वाही त्यांनी दिली.

झालेली ही सर्व घटना युवामंच व प्रकाश चषक आयोजन समीतिचे सर्व सदस्य व खेडाळू बघत होते. त्यावेळेस त्यांना पुन्हा एकदा साहेबांना युवकांविषयी असलेले प्रेम बघुन सर्व कार्यकर्ते व खेळाडूंचा आनंद द्विगुणित होऊन साहेबांविषयीचा आदर पुनः एकदा उंचावला. आणि म्हणूनच त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात युवकवर्ग जुळलेला आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here