वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरी दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना अटक
पोलिसांनी लावला दरोडेखोरांचा अवघ्या १२ तासात छळा
आरमोरी-पत्रकार असल्याची बतावणी करून येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून, त्यांना धक्काबुक्की करून,धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या व १ लाख रुपये बळजबरीने चोरून नेणाऱ्या पाच आरोपींना आरमोरी पोलिसांनी अवघ्या बारा तासात जेरबंद करून मुसक्या आवळले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमित प्रभाकर वांद्रे वय वर्षे (३२)रा.धरमपेठ नागपूर ,दिनेश सदाशिव कुंभारे वय वर्ष (४२)रा. मनीष नगर नागपूर, विनय विजय देशभ्रतार वय वर्ष( २७) रा.कौशल्या नगर नागपूर, रोशन भैय्यालाल बारमासे वय वर्ष (३६)रा. इंदिरानगर नागपूर, सुनील मधुकर बोरकर वय वर्षे (४६) रा. हिरवी नगर नागपूर असे आहे
प्राप्त माहितीनुसार आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात डाँ.अमोल धात्रक हे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांची पत्नी डाँ.सोनाली धात्रक ह्यांचा उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर खाजगी दवाखाना असून हे दोघेही पती पत्नी शासकीय क्वार्टर मध्ये वास्तव्यास राहतात.
प्राप्त माहितीनुसार दिनांक ०३.०८.२०२३ रोजी रात्रो ०९.१५ वाजताच्या सुमारास विनय नावाचा इसम व त्याचे ०५ साथीदार डाँक्टर अमोल धात्रक यांच्या शासकीय क्वार्टर मध्ये जबरदस्तीने प्रवेश करून फिर्यादी डाँक्टर सोनाली धात्रक यांना धक्का देवून बेडवर पाडले व फिर्यादीचे पतीला धक्का देवुन सोफयावर पाडले. तुम्ही फॉड आहेत, तुमची डिग्री फॉड आहे. असे म्हणून ५,००,००० /- रू. मागणी केली. व फिर्यादीचे घरगुती कामाकरिता बॅकमधुन काढलेले १,००,०००/- रूपये फिर्यादीचे पर्स मधुन आरोपींनी जबरदस्तीने काढुन, व त्यांना जिवे मारून टाकू अशी धमकी देवुन उदयाला पुन्हा येतो असे म्हणून निघून गेले. दिनांक ४-८-२०२३ रोजी सकाळी१०.३० वा. फिर्यादीचे पती उपजिल्हा रूग्णालय आरमोरी येथे डयुटीवर असतांना उर्वरित ४,००,०००/- रूपये घेण्याकरीता आले व उर्वरित रक्कम आम्हाला दया नाही तर जिवे ठार मारू, असे म्हणून निघून गेले. व फिर्यादीचे पतीचे मोबाईलवर दुपारी १२.१० वा. फोन करून फिर्यादीचे पतीला उर्वरित रक्कम दया नाही तर तुम्हाला आरोग्य उपसंचालक नागपुर यांचे समोर उभे राहण्याची तयारी ठेवा, तुमची प्रतीमा मलीन करून टाकीन, तुमची बातमी प्रकाशित करू, तुम्हाला पाहुन घेवू. अशी धमकी देवून निघून गेले.
याबाबत आरमोरी पोलीस स्टेशनला झालेल्या घटनेबद्दल या डाँक्टर दाम्पत्यांनी रीतसर तक्रार दाखल केली.पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागी पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त पथकाने तक्रार दाखल झाल्यापासून बारा तासाच्या आत पाच आरोपींची ओळख पटवून आरोपीना अटक करण्यात आली. त्यांच्यावर भांदवी ३९५,४५०,३८५,५०६ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या पाचही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक ०८ ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.अधिक तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप मंडलिक ,महिला पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे,पो. नाईक राजू उराडे,करीत आहेत.


