Home कोरची कोरची तहसील कार्यालयामार्फ़त तालुक्यातील महाविघालयात “युवा संवाद” कार्यक्रम 

कोरची तहसील कार्यालयामार्फ़त तालुक्यातील महाविघालयात “युवा संवाद” कार्यक्रम 

0
32

 

कोरची

शासकीय योजनेचा प्रत्यक्ष लाभ जनतेपर्यंत पोहचविण्याचे अनुषंगाने तहसिल कार्यालय कोरची अंतर्गत दिनांक १ ऑगस्ट २०२३ पासुन दिनांक ०७ ऑगस्ट २०२३ पर्यंत महसुल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक २ ऑगस्ट २०२३ रोजी “युवा संवाद” या कार्यक्रमाचे अंतर्गत तालुक्यातील वनश्री महाविद्यालय, कोरची व स्व. मोरेश्वर फाये विज्ञान महाविद्यालय कोरची या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधुन त्यांना पुढील शिक्षणासाठी १० वी व १२ वी नंतर विविध क्षेत्रातील संस्थेमध्ये प्रवेशासाठी लागणारे प्रमाणपत्र / दाखल्याबाबतची माहिती तसेच निवडणूक शाखेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे १८ वर्षे पुर्ण झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी नमुना ६, चे फॉर्म भरुन नवमतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्याबाबत सुचना देण्यात आली. तसेच विविध घटकांतील लाभार्थी विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, त्यांच्यासाठी रावविण्यात येणारे विविध कार्यक्रम व योजनाबाबत व शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार करणे/ अद्यावत करणे याकरीता विद्यार्थ्यांना माहीती देण्यात आली.

कोरची वनश्री महाविद्यालय प्राचार्य डॉ व्ही. टी. चहारे, व स्व. मोरेश्वर फाये तथा श्रीराम महाविद्यालयांचे प्राचार्य एस. एस. सोनुले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नायब तहसिलदार ए. के. बोदेले, नायब तहसिलदार जि. बी. सोनवाणी, तसेच वि. टी. भगत व बि.यु. नंदागवळी यांचे उपस्थीतीत “युवा संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांसह प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here