0
9

जखमी वैभव पांढरे यांच्या मदतीला धावले आमदार धर्मरावबाबा आत्राम

“उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही; पांढरे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे”

गडचिरोली ! अहेरी, : नुकत्याच घडलेल्या गंभीर घटनेत जखमी झालेल्या वैभव पांढरे यांची आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. या घटनेची माहिती मिळताच आमदार आत्राम यांनी तत्काळ रुग्णालय गाठत वैभव यांना धीर दिला आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून आधार दिला.

यावेळी आमदार आत्राम यांनी वैभव पांढरे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली. जखमी युवकाला सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच उपचार प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी बोलताना आमदार धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “वैभव पांढरे यांच्यावर सर्वोत्तम उपचार केले जातील. या कठीण प्रसंगी आम्ही पांढरे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.”

दरम्यान, आमदार आत्राम यांनी वैभव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रशासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या भेटीदरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here