![]()
गडचिरोलीः एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील तब्बल ७० विद्यार्थ्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्याने एकच खडबड उडाली आहे.
भामरागड प्रकल्प कार्यालय अंतर्गत येत असलेल्या लाहेरी येथील शासकीय आश्रम शाळेतील तब्बल सत्तर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होत असल्याने तब्बल ७० विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० विद्यार्थी आणि भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात ४० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे भामरागड येथे उपचार अर्थ दाखल केलेल्या चाळीस विद्यार्थ्यांपैकी ०१ विद्यार्थी आणि १० विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलविण्यात आल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार मंगळवारी (२७ जानेवारी) रोजी रात्रीच्या सुमारास जेवण केल्यानंतर शासकीय आश्रम शाळा लहरी येथील एका विद्यार्थ्याला पोटदुखीचा त्रास झाला होता.२८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एका मागून एक असे तब्बल ७० विद्यार्थ्यांना असाच त्रास होऊ लागल्याने येथील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येते उपचारार्थ दाखल दखल केले. ४० विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले.
विशेष म्हणजे भामरागड ग्रामीण रुग्णालयात २२ मुले आणि १८ मुली असे एकूण ४० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असतानाच ०१ मुलगी आणि ०१ मुलगा असे ०२ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले असल्याची माहिती सहाय्यक प्रकल्पाधिकारी रोषणा चव्हाण यांनी दिली आहे.



