आलापल्ली वन विभागाचा भोंगळ कारभार ; आलापल्ली वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड
अहेरी: आलापल्ली वनविभागातील आलापल्ली वनपरिक्षेत्रात मोठ्याप्रमाणात अवैध वृक्षतोड झाल्याची बाब उजेडात आली आहे.या अवैध वृक्षतोडप्रकरणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
आलापल्ली उपक्षेत्रातील खंड क्रमांक 8 मध्ये अवैध वृक्षतोड झाल्याची बाब उघडकीस आल्यावर सदर प्रकरण अंगलट येणार म्हणून येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वन अपराधाचे पहिले प्रतिवृत्त (POR) नोंदवल्याची माहिती समोर आली असली तरी या प्रकरणाने आलापल्ली वनविभागातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे ही घटना मागील काही दिवसांपूर्वीची असून प्रकरण अंगलट येणार असल्याचे कळताच उशिरा पीओआर नोंदविण्यात आले.
एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असताना येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष कसे नाही ? किंवा अप्रत्यक्षपणे अशा लोकांना खाकीचा सपोर्ट तर नाही ना ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून वन विभागाचे अधिकारी अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ की कारवाई करणार ? किंव्हा हे प्रकरणही वनखात्याच्या फाइलमध्ये दफन होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आलापली वनपरिक्षेत्र कार्यालयात असे आणखी नवनवीन प्रकरण समोर येत असून स्थानिक नागरिकांतून रोष व्यक्त केला जात आहे. वन संरक्षणाच्या नावाखाली चाललेल्या भ्रष्टाचारावर लगाम घालण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व पारदर्शक कारवाई करावी अशी मागणीही होत आहे.
बीटा मध्ये अनेक कामे सुरू असतात एक वनरक्षक प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही.याच गोष्टीचा फायदा घेऊन काही असमाजिक तत्त्वांकडून असे कामे केली जातात. त्याची आम्ही वेळीच दखल घेतली आहे. नियमानुसार त्यावर आम्ही पीओआर नोंदविला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
-गौरव गणवीर
वनपरिक्षेत्र अधिकारी, आलापल्ली