Home Breaking News अॅग्रोटेक २०२५ मध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या ‘ट्रायसेफ’चा डंका ; ७ स्टार्टअप्सची ५० हजारांची...

अॅग्रोटेक २०२५ मध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या ‘ट्रायसेफ’चा डंका ; ७ स्टार्टअप्सची ५० हजारांची विक्री, कुलगुरूंकडून कौतुक

0
25

 

गोंडवाना विद्यापीठाच्या ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राचा अ‍ॅग्रोटेक २०२५ सहभाग

गडचिरोली : दि. 10/01/26 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या वतीने आयोजित अ‍ॅग्रोटेक २०२५ या भव्य कृषी व नवसंशोधन प्रदर्शनात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत कार्यरत ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राने प्रभावी सहभाग नोंदविला.

या प्रदर्शनात ट्रायसेफ नवसंशोधन केंद्रा अंतर्गत कार्यरत विविध इनक्युबेटेड स्टार्टअप्सनी आपली उत्पादने व सेवा सादर केल्या. प्रदर्शनीत ट्रायसेफ नवसंशोधन केंद्रातील १९ पैकी ०७ नऊद्योजकांनी सहभाग घेतला यामध्ये फ्रेशल अ‍ॅग्रोफॉरेस्ट्री एक्सपोर्ट्स एलएलपी (मोहुआ सिरप), गिराडकर नॅचरल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज एलएलपी (सेंद्रिय खाद्यतेल), अनिशिका महिला उद्योग एलएलपी (मोहुआ आधारित अन्नपदार्थ), कंपोसोइल बायोचार एलएलपी (बायोचार खत) तसेच पीफोरेस्टा एलएलपी (सेंद्रिय चंदन साबण) या स्टार्टअप्सचा समावेश होता. याशिवाय सोबाय टुरिझम एलएलपी (पर्यटन, नाईट कॅम्पिंग आणि ट्रेकिंग) आणि गेला गुट्टा टुरिझम एलएलपी (कृषी पर्यटन) यांनी ग्रामीण व निसर्गाधारित पर्यटन संकल्पनांचे सादरीकरण केले. सादरीकरण दरम्यान ट्रायसेफ नवसंशोधन केंद्रातील नऊद्योजकांतर्फे निर्मिती केलेले उत्पाद यांची अंदाजित ५०,००० रुपयांचे विक्री करण्यात आली.

या दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राला भेट देऊन इनक्युबेटेड स्टार्टअप्सच्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राद्वारे राबविण्यात येणाऱ्या नवसंशोधन, उद्योजकता विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

प्रदर्शनाच्या कालावधीत ट्रायसेफच्या स्टॉलला शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक तसेच कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी मोठ्या प्रमाणावर भेटी दिल्या. काही स्टार्टअप्सची उत्पादने मोठ्या मागणीमुळे प्रदर्शनाच्या कालावधीतच विक्रीस संपल्याचे निदर्शनास आले. जे स्टार्टअप्ससाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरले.

अ‍ॅग्रोटेक २०२५ मधील सहभागामुळे ट्रायसेफ नवसंशोधन केंद्र अंतर्गत कार्यरत स्टार्टअप्सना बाजारपेठेचा प्रत्यक्ष अनुभव, ग्राहकांचा प्रतिसाद तसेच उद्योगजगताशी संपर्क साधण्याच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून ग्रामीण व आदिवासी भागातील नवउद्योजकांना मुख्य प्रवाहात आणण्यास अशा उपक्रमांची मोठी मदत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here