कोरची:-
शासकीय आश्रम शाळा कोरची येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक मुख्यद्यापक उमाकांत ढोक सर आणी शाळेतील शिक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून मा ल्यार्पन करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक सर यांनी, विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालून आपली प्रगती करून घ्यावे असे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक वृंद व शालेय सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.


