संपुर्ण देशामध्ये “मेरी माटी मेरा देश” अभियान राबविण्यात येत असुन नगरपरिषद आरमोरी येथे सुद्धा या अभियानाचे अनुषंगाने दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सकाळी नगरपरिषद कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम, संत गाडगेबाबा चौक ताडुरवारनगर येथे शिलाफलक अनावरण व नागरीकांच्या हातात दिप देऊन पंचप्रण शपथ,सर्व पदाधिकारी व शहरातील नागरीक यांनी पालोरा रोड येथील कब्रस्थान परीसरात वसुधा वंदन एकाचवेळी 75 देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध प्रभागातील माती अमृत कलशामध्ये जमा करुन दिल्ली येथे होणाऱ्या अमृत वाटीका येथे पाठविण्याकरीता वरीष्ठ कार्यालयात सुपुर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक विरांना वंदन कार्यक्रमाअंतर्गत शहिदवीर तथा सैनिकांच्या कुटुंबीयांचा शाल ,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यानिमीत्याने मुलांकरीता वेशभुषा स्पर्धा, देशभक्तीपर गितगायन स्पर्धा इ. स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री कृष्णाजी गजबे साहेब, आमदार,आरमोरी विधानसभा क्षेत्र यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मा. श्री पवन नारनवरे,अध्यक्ष,नगरपरिषद आरमोरी, हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये श्री हैदरभाई पंजवाणी, उपाध्यक्ष,नगरपरिषद आरमोरी मा.श्री मंडलीक साहेब,पोलिस निरीक्षक, ,श्री भारत बावनथडे,आरोग्य व स्वच्छता सभापती, श्री विलास पारधी, पाणीपुरवठा सभापती, सौ. सुनिताताई चांदेवार, महिला व बालकल्याण सभापती, श्री सागर मने, बांधकाम सभापती,सौ गिताबाई सेलोकर,नगरसेविका, श्री मिथुन मडावी,नगरसेवक, सौ निर्मला किरमे,नगरसेविका, सौ सिंधुताई कापकर,नगरसेविका,सौ प्रगती नारनवरे,नगरसेविका, सौ सुनिता मने, नगरसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाला तसेच आयोजीत स्पर्धत मोठया प्रमाणावर विद्यार्थी, नागरीकांनी सहभाग नोंदविला.
वेशभुषा स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक धृप चापले, द्वितीय पारितोषिक अभिश्री भुषण भोयर, तृतीय पारितोषिक स्वरा बोबाटे यांनी पटकावला.गितगायन स्पर्धा 15 वर्षाखालील गटात प्रथम पारितोषिक निरुता उरकुडे, द्वितीय पारितोषिक चिराग सपाटे, तृतीय पारितोषिक पारस गोरे यांनी पटकावला. गितगायन स्पर्धा खुला गटात प्रथम पारितोषिक छायानंद धकाते, द्वितीय पारितोषिक सुलभा भोयर, तृतीय पारितोषिक शामराव हेमके यांनी पटकावला.
कार्यकमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री कौस्तुभ रोकमवार, विद्युत अभियंता यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरीता मुख्याधिकारी श्री एच.एन.दोनाडकर, श्री अविनाश बंडावार,शहर अभियंता, श्री आशिष हेमके, कार्या.अधिक्षक, श्री नितीन गौरखेडे ,पा.पु.व स्वच्छता अभियंता, श्री गिरीष बांते, लिपीक, कु अनिता भडके, श्री योगराज दुमाने,श्री ज्ञानेश्वर दुमाने, श्री राजु कांबळे, श्री विनोद देवगि रकर व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम केले


