Home कोरची महाराष्ट्रातून कर वसुलीत कोरची नगरपंचायत तृतीय; प्रशस्तीपत्र देवून गौरव

महाराष्ट्रातून कर वसुलीत कोरची नगरपंचायत तृतीय; प्रशस्तीपत्र देवून गौरव

0
25

 

कोरची
कोरची नगरातील सन २०२२-२३ मधिल ९६ टक्के घर पट्टी वसुली केल्याबद्दल नगर पंचायत कोरची यांना महाराष्ट्रातून तृतीय क्रमांक आज नगर विकास दिनाचे औचित्य साधुन देण्यात आला.
सदर आशयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच डॉ. सोनिया सेठी प्रधान सचिव नगर विकास विभाग यांच्या संयुक्त सहिने प्रमाणपत्र नगर पंचायत कोरची यांना प्रदान करण्यात आले. नगर पंचायत कोरची चे वसुली पथकाचे नेतृत्व कर अधीक्षक बाबासो हाक्के यांनी केले या पथकात कर लिपीक रवींद्र मडावी, लेखापाल सुदीप ढोले, लिपीक जयपाल मोहुरले, नरेंद्र कोतकोंडावर, विजय जेंगठे, अनिता येरमे, आशिष रघोर्ते, सागर बनपूरकर इत्यादी सदस्य होते.
वसुलीसाठी प्रत्येक नागरिकांच्या घरी वारंवार जावून त्याचप्रमाणे थकीत नागरिकांच्या मालमत्ता सिल कराव्या लागत होते. उन्हाळ्याचे दिवस असताना सकाळीं ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण शहरात फिरावे लागत होते. काही नागरिकांचे अपशब्द हि ऐकावे लागत होते तर सुट्टीच्या दिवशीही काम करून या पथकाने कोरची नगर पंचायती ला तृतीय क्रमांक मिळवून दिला आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here