………………………………….
कोरची– विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एकलव्य आदर्श निवासी विद्यालय देवाडा जिल्हा चंद्रपूर येथे दोन दिवसीय विभागीय ‘कला उत्सवांचे’ दिनांक 12 व 13 सप्टेंबर २०२४ ला आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात विविध सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यात एकलव्य आदर्श निवासी विद्यालय ,कोरची येथील विद्यार्थ्यांनी या कला महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी केली. मा.प्राचार्य श्री धर्मेंद्रसिंह ठाकुर यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी विशेष कार्यक्रम आखून दिला होता, आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहित केले होते. विविध कला प्रकाराची तयारी करून तयारी करून घेण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख जान्हवी शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. थ्रीडी मूर्तीकला कला प्रकारात गोरी कोराम तिने प्रथम पारितोषिक मिळविले ,वाद-विवाद स्पर्धेत इशिका कुंभरे हीने द्वितीय पारितोषिक मिळविले तर चित्रकला प्रकारात झांसी नरेटी ,काव्यवाचन प्रकारात सोनाली दुधनांग आणि संस्कृत श्लोक पठण स्पर्धेत योगिता ताराम यांनी तृतीय पारितोषिक मिळविले. पारितोषिक विजेते विद्यार्थी , कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी आणि देवाडा येथील सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याकरीता विद्यार्थ्यां सोबतअसलेले वसतिगृह अधीक्षक निखिल दाणे व कला शिक्षक जान्हवी शर्मा यांचा सत्कार एकलव्य विद्यालयाच्या वतीने प्राचार्य धर्मेंद्रसिह ठाकूर यांनी कौतुक केले.


