शाळा व्यवस्थापन समिती व सर्व गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारीला केला निवेदन
कोरची
कोरची तालुक्यातील अतिदुर्गम कोटगुल परिसरातील वाको जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तात्काळ शिक्षकाची नियुक्ती करावी अन्यथा येत्या आठ दिवसात शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीने कोरची गटशिक्षण अधिकारी अमित दास यांना निवेदनातून केलेला आहे.
इयत्ता सहावी व सातवी च्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार शिक्षक बदलीवर दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. वर्ग पहिली ते सातवी ची शाळा असून दोन शिक्षक शाळेत शिकवण्याचे कार्य करीत आहेत. दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी माध्यमानंतर श्री नवघडे सर विषय शिक्षक शाळेतून भार मुक्त झाले आहेत त्यामुळे सहावी ते सातवी वर्गाकरिता शिक्षकाची आवश्यकता आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व गाववासीयांनी मागणी केली आहे मागणीत दिनांक 2 फेब्रुवारी पासून पुढे आठ दिवसाच्या आत वाको जिल्हा परिषद शाळा येथे शिक्षक देण्याचे निवेदनातून विनंती केली असून शिक्षक न मिळाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समिती वाको तथा गावकऱ्यांनी केली आहे.
कोरची गटशिक्षणाधिकारी अमित दास यांना निवेदन देताना वाको शाळा व्यवस्थापन अध्यक्ष बजरंग मिरी, माजी पंचायत समिती सभापती श्रावण मातलाम, उपाध्यक्ष मनोज पायफुल, रेखाबाई धुर्वे, प्रतिमा टेंभूर्णी, कोमल कुमारे, ईश्वरीबाई थाटमुरी, आशोबाई मातलाम, मोहन मडावी, सनकुमार कुमरे, संतानु धिकोडी, सगनुराम बागडेरिया, शेकालाल गंगासागर, भगोली राऊत, तुकाराम कपूरडेरीया, सुग्रीव धिकोडी, नरपत धिकोडी, इंद्रकुमार सोनवानी, श्यामलाल बखर, गणेश धुर्वे, लेमन सोनकलांस, रोहित धिकोडी, जोहन धिकोडी, अवद कार्यपालन, भगत छापा, शिवकुमार बागडेरिया, हंसकुमार छापा, जगदीश ठाटमुरी, देवारू सोनकलस आदी उपस्थित होते.


