Home कोरची कोरची तहसील कार्यालय पटांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात

कोरची तहसील कार्यालय पटांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात

0
31

 

 

तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या हस्ते झाला ध्वजारोहण

 

कोरची

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त कोरची येथील तहसील कार्यालयच्या भव्य पटांगणावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २६ जानेवारी सकाळी ९:३० वाजता तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार प्रशांत कदम यांच्या ध्वजारोहण झाले. यानंतर महाराष्ट्र राज्य गीत म्हणण्यात आले त्यानंतर संविधान वाचन सुद्धा करण्यात आले.

मराठी भाषा संवर्धन पंधरावा (दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी ) तहसील कार्यालयात राबविण्यात आला. त्यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील थोर पुरुषांचे पुस्तके वाटप करण्यात आले. दरम्यान मतदार नोंदणी सन 2023 मध्ये मतदार नोंदणी करिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच तालुका निवडणूक शाखेतील ऑपरेटर यांना आणि जिल्हा परिषद शाळा कोरची येथे 25 जानेवारीला मतदार दिनानिमित्त आयोजित रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धेमधील प्राविण्य प्राप्त नऊ विद्यार्थ्यांना तहसीलदार प्रशांत गड्डम पोलीस निरीक्षक अमोल फडतरे एस आर पी एफ पोलीस निरीक्षक चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच यानंतर कोरची येथील सर्व शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर केला.

यावेळी कोरची येथील सर्व शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय शाळा महाविद्यालय, पोलीस स्टेशन, वसतिगृह, औदयोगिक प्रशिक्षण केंद्र, बँक येथील अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक महिला उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here