Home आरमोरी श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी येथे प्रजासत्ताक दिन साजरा

श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी येथे प्रजासत्ताक दिन साजरा

0
25

 

आरमोरी,

स्थानिक श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी प्रांगणात प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनाच्या औचित्याने ध्वजारोहणाचा कार्यक्रम दि. २६ जानेवारी २०२४ ला सकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आला. यावेळी श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग, आरमोरीच्या प्राचार्या कु. पूनम नारनवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी उपस्थित विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना उद्बोधित करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. साई स्कूल ऑफ नर्सिंग, आरमोरीचे संचालक श्री. सुधाकरजी साळवे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बुद्धिबळ स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गीते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन संकेत बुद्धेवार याने केले तर आभार मुकेश अल्लीवार याने मानले. यशस्वीतेसाठी संगम मेश्राम, पल्लवी कोथळकर, चंदू दुमाने, करिष्मा हांडे, भाग्यश्री मेश्राम, भूषण ठकार, सचिन काळबांधे, अल्का मारभते, स्नेहा बोरकर, वासुदेव फुलबांधे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here